मैदानी स्पर्धेत शिंदे महाविद्यालय तालुक्यात अव्वल.!

भद्रावती (ता.प्र.) - क्रिडा संचालनालय पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा भद्रावती येथील तालुका क्रीडा स्टेडियमवर नुकत्याच घेण्यात आल्या. विविध मैदानी क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू प्राविण्य प्राप्त करत तालुक्यात अव्वल आले. तालुका अव्वल येवून त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड निश्चित केली.
मैदानी क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे वयोगटाखालील मुलांमध्ये कार्तिक वावरदडपे हा खेळाडू गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम आला. लोकेश काळे हा खेळाडू लांब उडी व उंच उडी या क्रीडा प्रकारात तालुक्यात अव्वल आला . अमन विरुडकर हा खेळाडू म्हणून 1500 मीटर दौड स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आला.
19 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये ऋतुजा खापणे ही खेळाडने लांब उडी व उंच उडी या क्रिडा प्रकारामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केले. तर वैष्णवी मेश्राम हिने गोळा फेक व थाळीफेक या स्पर्धेतील तालुक्यात प्रथम आली. 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुमित कैथल हा भाळाफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम आला. 
विजयी सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्यातून निवड झाली. जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण , डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. सुधीर मोते , किशोर ढोक , भीष्माचार्य बुरकुटे व समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले, पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.