बल्लारपूर राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात,कौशल मनोज तिलोकानी यांची व्यापारी आघाडी बल्लारपूर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदावर नियुक्ती.!
बल्लारपुर (का. प्र.) - राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.हेच काम बघता कौशल तिलोकानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश घेतला,तसेच इंजि. राकेश सोमाणी यांच्या हस्ते कौशल तिलोकानी यांना व्यापारी आघाडी अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमात कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमानी, बल्लारपूर विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी साठे,सुमित (गोलू) डोहणे,अमर रहिकवार,अंकीत निवलकर,बबलू पठाण, लालू काब्रा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.