ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार - ॲड. चैतन्य भंडारी .!

धुळे (जगदीश काशिकर) - आपण नेहमी ब्ल्यू टुथचा वापर करीत असतो व सध्या ब्ल्यू टुथ हे प्रत्येक मोबाईल, स्मार्ट वॉच, लॅपटॉप इ. मध्ये देखील ब्ल्यू टुथ असतात. हल्ली ब्ल्यु बगिंग हा एक हॅकींगचा नविन प्रकार असून याच्यात सायबर गुन्हेगार त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईल किंवा संगणक मधली वैयक्तिक माहिती, डाटा चोरण्याचा प्रयत्न करतात व ब्ल्यू बगिंग हा सायबर गुन्हेगारांना आपले कॉल्स, टेक्स्ट मॅसेजेस, सायबर गुन्हेगारांच्या नंबरवर कॉल फॉरवर्ड करणे असे काम करतो. जेव्हा एखादयाचा मोबाईल मध्ये ब्ल्यू टूथ मोड ऑन असेल आणि ती व्यक्ती सायबर गुन्हेगारापासून दहा मिटर अंतरावर असेल तर सदरील सायबर गुन्हेगार ब्ल्यू टुथच्या माध्यमातून सदरील व्यक्तीच्या मोबाईल, लॅपटॉप मध्ये वायरस पाठवतो आणि त्याव्दारे आपली गोपनिय माहिती सदरील गुन्हेगाराकडे ब्ल्यू बगिंग व्दारे सायबर गुन्हेगाराकडे जाते. जर तुमच्या मोबाईल मधील मोबाईलची बॅटरी लवकर कमी होणे, वेगवेगळया प्रकारच्या अनाहुत जाहिराती येणे किंवा तुमचा मोबाईल गरम होणे तर समा तुमचा ब्ल्यू टुथ सुरक्षित नाही, म्हणून जर तुम्हाला ब्लयू बगिंग अटॅकपासून दूर राहयचे असेल तर आपल्या फोन किंवा संगणकामध्ये सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवावे, जेव्हा ब्लयू टूथची गरज नसेल तेव्हा त्याला बंद ठेवा, जर तुम्ही स्मार्ट वॉचचा वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला जेव्हा ब्लयू टुथची गरज असेल तेव्हाच तुम्ही ते मोबाईलव्दारे कनेक्ट ठेवा, अज्ञात व्यक्तीकडून येणारी ब्ल्यू टुथ पेअरींग रिक्वेस्ट स्वीकारू नका व ब्ल्यू बगिंग पासून सुरक्षित रहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.