बल्लारपुर (का.प्र.) - परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे. अंबाझरी तलाव, नागपूर येथे असलेल्या 20 एकर 9 गुंठे जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक बांधण्याच्या ऐवजी महाराष्ट्र शासनाने 2017/2018 साली ही जमीन एका 'गरुडा अम्युजमेंट पार्क' (डायरेक्टर नागपूर ) या खाजगी कंपनीस टेंडर द्वारे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यास हस्तांतरित केली.
बाबासाहेबांच्या नावे असलेल्या जमिनीवर एक आंबेडकर सांस्कृतिक भवन गेली 50 वर्षे अस्तित्वात होतें. ह्या ठेकेदाराने ने हे सभागृह बेमालूमपणे, चोरी छुपे उध्वस्त केलं. त्याच्या निषेधार्थ डॉ आंबेडकर भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समिती द्वारे आंबेडकरी, समाज, संविधान प्रेमी कार्यकर्ते, नागरिक यांनी मोर्चे, सभा, आंदोलने, धरणे, निवेदने अशा सर्व संवैधानिक मार्गाने हया कट कारस्थाना चा निषेध केला आणि तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने मागणी केली की -
1. महाराष्ट्र शासनाने मे. गरुडा अम्युज मेंट पार्क ह्या खाजगी कंपनी शी जो करारनामा आणि अवॉर्ड स्वाक्षरीत केले आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावे.
2. आंबेडकर स्मारक उद्ध्वस्त करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर - बिल्डर ला अटक करून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करा.
3. या 20 एकर 9 गुंठे जागेवर परमपूज्य डॉ. बाबासाहेब यांचे अती भव्य स्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, ऑडिटोरीयम, व पार्किंग, रेस्टॉरंट, प्रसाधन सोयी व लॉन इत्यादि विकसित करण्यात यावे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरां च्या नावे तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आबांटित केलेली स्मारकासाठी राखीव असलेली जमीन भाजप सरकारने खाजगी ठेकेदाराला विकून, सुरुवातीला 30 वर्षाची v नंतर 99 वर्षाची लीज वर देऊन डॉ. बाबासाहेबांचा घोर अपमान केला आहे.
ह्या अपमाना च्या विरुद्ध स्वाभिमानी आंबेडकरी जनता मागील एक वर्षापासून आंदोलने करीत आहे.आपणा सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन करतो की बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राखीव 20 एकर 9 गुंठे जमीन वाचवण्यासाठी ह्या लढ्यात सहभागी व्हा. आंबेडकरी समाज स्वाभिमानी, कृतिशील व जागृत आहे हे दाखवून द्या.
ही लढाई आपल्या स्वाभिमानाची व अस्तित्वाची आहे ह्याची जाणीव ठेवा. ह्या आवाहनाचा प्रचार सर्वत्र करा . धन्यवाद !!!!
आपला सहकारी,
किशोर गजभिये
मुख्य संयोजक ( 9619777514 )
डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर (अंबाझरी) बचाव कृती समिती, नागपूर.