जागतिक दिव्यांग दिवसा निमित्त श्री मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पर्शि मनोगत.!
मुंबई (जगदीश काशिकर) - जागतिक दिव्यांग दिवस निमित्ताने, औटीझम ( स्वमग्न ) मुलांच्या विविध स्पर्धाना कांदिवली, मुंबई येथे उपस्थित होतो...या विशेष मुलांना समाजाने स्विकारले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी नव दिव्यांग फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री मुथा गेली अनेक वर्षे काम करत आहेत.
या सर्व विशेष मुलांच्या आई - वडिलांना साष्टांग दंडवत आहे... एवढं मोठं दुःख उराशी बाळगून या मुलांचे पालक आपल्या लेकरांना वाढवत आहेत.
या विशेष मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यात त्यांना रोजगाराच्या काही संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाउंडेशन कार्यरत आहे.
संवेदनशील मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे आणि संवेदनशील खासदार मा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच या विशेष मुलांसाठी काही रचनात्मक काम उभं करता येईल का यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे.
फाउंडेशन चे श्री मुथाजी आणि पत्रकार सन्मित्र श्री सोमदत्त शर्माजी यांचे मनापासून आभार.
पत्रकार श्री सोमदत्त शर्मा यांच्याकडून त्यांच्या स्वतःची मुलाची आणि अशा इतर अनेक विशेष मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या दर्दभरी कहाणी ऐकून डोळ्यांत अश्रू दाटून येत होते.
परमेश्वराकडे एकच विनंती आहे की, एक तर अस दुःख कुणाच्याच वाट्याला देऊ नको, आणि कुणाच्या वाट्याला असं दुःख आलंच तर या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती या विशेष मुलांच्या पालकांना मिळो.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत आर्थिक मदत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.