माजी आमदार पांडुरंग बरेरा यांचा मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आलेला अविस्मरणीय अनुभव.!
शहापूर (जगदीश काशिकर) - मातोश्री येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कै. भगवान काळे, कसारा यांच्या मुलीची शैक्षणिक खर्चाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ लाख १० हजार रोख स्वरूपात देऊन आपली जबाबदारी पार पाडली.
शहापूर तालुक्यातील कसारा येथील कै.भगवान काळे हे ६ जुलै २०२२ रोजी मातोश्री येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येवून दुर्दैवी मृत्यु झाला होता.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी तेव्हा माजी आमदार पांडुरंग बरोरा व ठाणे जिल्हा शिवसेना सचिव साईनाथ तारे यांच्या माध्यमातून काळे कुटुंबीयांना ३ लाखांची आर्थिक मदत पोहचविली व दुरध्वनी वरून काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच त्यांच्या निराधार मुलांची शिक्षणाची आर्थिक जबाबदारी स्वीकारली होती.
नेहमीच मदतीसाठी धावून जाणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली जबाबदारी पार पाडत कै.भगवान काळे यांची मुलगी कु.आश्लेषा भगवान काळे या मुलीची शैक्षणिक फी ४ लाख १० हजार रोख स्वरूपात महाराष्ट्राचे उपनेते प्रकाश पाटील व संपर्क प्रमुख बाळ्यामामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. मुख्यमंत्री झाले तरी आपले कर्तव्य विसरले नाही याचा प्रत्यय आजच्या मदतीने दिसून आला.