शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अभ्यासु व्यक्तिलाच विधान परिषदेत पाठवा.!
चंद्रपूर (वि.प्र.) - विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाच्या संमतीशिवाय कोणत्याही बिलाचे कायद्यात रूपांतर होत नाही. शिक्षकांच्या व शिक्षणाच्या समस्या सोडविण्यासाठी सभागृहात अभ्यासू व्यक्तीच गेला पाहिजे. व्यवस्थेशी तडजोड करून शिक्षकांच्या अडचणीमध्ये दुर्लक्ष करणारी व्यक्ती तुम्ही सभागृहात पाठवणार आहात काय? असा घनाघाती सवाल 4 डिसेंबर 2022 ला पार पडलेल्या शिक्षक अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला.
चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यलयाच्या सभागृहात शिक्षक भारती चंद्रपूर तर्फे जिल्हा शिक्षक मेळावा 4 डिसेंबर 2022 ला संपन्न झाला . या सभेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना आमदार कपिल पाटील म्हणाले की एन. ए. पी. 2022 चे आपण समर्थन करणार आहात काय ? ज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाची द्वारे बंद होणार आहेत. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे कित्येक शिक्षक व त्यांचे कुटुंब उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या काळात हे संभाव्य धोके लक्षात घेता त्यावर वैचारिक वादविवाद व भाष्य करून शिक्षकांच्या समस्या सोडवणारीी अभ्यासु लढवैय्य व्यक्तीच सभागृहात जायला पाहिजे. म्हणून आपण सर्व शिक्षक बांधवांनी प्रा. राजेंद्र झाडे यांच्यासारख्या आक्रमक व अभ्यासू व्यक्तीला सभागृहात पाठवा, असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केले.
4 डिसेंबर 2022 ला सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे,अध्यक्ष, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा, संचालक जि.म. सहकारी बँक चंद्रपूर हे होते. तर उद्घाटक म्हणून माजी आमदार वामनराव चटप राजुरा , प्रमुख अतिथी आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर , प्रशांतभाऊ पोटदुखे चंद्रपूर, शिक्षक भरतीचे उमेदवार राजेंद्र झाडे, किशोर वरभे, संजय खेडीकर ,भाऊराव पत्रे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडीकर सर यांनी केले . उद्घाटकीय भाषणात वामनराव चटप यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कपिल पाटल यांचा लढवैय्य सहकारी राजेंद्र झाडे निवडा, असे मार्गदर्शन केले. तर डॉ. विजय देवतळे यांनी सामान्य बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहापासून दूर लोटणाऱ्या , शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार कपिल पाटील यांचे हात बळकट करा असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले. राजेंद्र झाडे यांनी आपण प्रचारात आघाडी घेतली आहे,आपण प्रत्येक्ष भेटून प्रचार करत आहात, हा प्रचार आपण असाच सातत्यपूर्ण करणार आहात व आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डांगे यांनी केले , तर पुरूषोत्तम टोंगे यांनी आभार मानले.यावेळी निसार शेख यांना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष,पेटकर सर यांना जिल्हा संघटक, सुहास पडोळे सर यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर बावनकर जिल्हाध्यक्ष, डॉ. ज्ञानेश हटवार जिल्हाध्यक्ष क. महा. , सुरेश डांगे विभागीय प्रमुख, अशोक तूमराम जिल्हासंघटक , किशोर दहेकर शहराध्यक्ष, वासेकर सर, पुरुषोत्तम टोंगे कार्याध्यक्ष, राकेश पाताडे सचिव, दीपक जवादे, खंडाळकर , तथा चंद्रपूर शिक्षक भारती परिवारातील समस्त सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होतेे. कार्यक्रमानंतर लगेच सगळ्यांच्या निवेदनांचा स्वीकार करण्यात आला . हिवाळी अधिवेशनात यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्यात येईल असे आश्वस्थ केले.