भद्रावती (ता. प्र.) - जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे सुरू आहेत. यात मैदानी स्पर्धेत शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त कले. या 3 खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये कु. वैष्णवी मेश्राम या खेळाडूने गोळा फेक स्पर्धेत जिल्ह्यात यश संपादन करून दुसऱ्या क्रमांकावर प्राप्त केला. विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूची निवड झाली असून ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे . ऋतुजा खापणे ही यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी उंच उडी मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेतला. विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 17 वर्षे वयोगटाखालील मुलांमध्ये सुमित कैथल हा खेळाडू भालाफेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये या खेळाडूने 35 मीटर भाला फेकून एक नविन उच्चांक स्थापित केलेला आहे. विभागीय स्पर्धेसाठी तो चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील या खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात नाव लौकिक करून विभागावर निवड झाली, अशा सर्व खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक , अनिल मांदाडे, माधव केंद्रे , समस्त प्राध्यापकांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . तसेच विभाग स्तरीय होणाऱ्या मैदानी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.