९६ वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.!

कवी प्रकाश पिंपळकर व जेष्ठ कवी रमेश भोयर यांच्या कवितेची 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कवीकट्टा,साठी निवड.!
भद्रावती (ता. प्र.) - विदर्भ साहित्य संघ शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे ३,४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडत आहे. या संमेलनात ऐतिहसिक नगरी भद्रावती येथील कवी प्रकाश पिंपळकर व रमेश भोयर यांच्या कवितेची दखल वर्धा येथे संपन्न होत असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने घेतली असून संमेलनातील 'कवी कट्टा 'या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.प्रकाश पिंपळकर व रमेश भोयर यांना संगीत,साहित्याची, नाट्य कलेची व सामाजिक कार्याची आवड असून ते अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक सु वी साठे , ग्रामगीताचार्य अनिल पिट्टलवार,प्रवीण आडेकर,रमेश खातखेडे, डॉ ज्ञानेश हटवार, डॉ सुधीर मोते,सचिन सरपटवार,विवेक सरपटवार व झाडीबोली साहित्य मंडळ,गुरुदेव सेवा मंडळ ,रोटरी क्लब भद्रावती,विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.