जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूरचे शिक्षक भाष्कर बावणकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानीत.!
भद्रावती (ता.प्र.) - भास्कर बावणकर यांना कोल्हापूर येथील अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेचा 2022 -23 चा भारत भूषण पुरस्कार खुलताबाद जि. औरगांबाद येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात वैद्यकीय समितीचे राज्याधाक्ष डॉ. अमोल जाधव व जेष्ट साहित्यीक डॉ. गिरीष लटके, महाजन, भोसले याच्याहस्ते प्रदान करण्यात आला . या पुरस्काराबदल संस्थेचे संस्थापक श्री परशुरामजी नन्नावरे यांनी भास्कर बावणकर यांचे अभिनंदन केले .
श्री भास्कर बावणकर यांनी आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थीतीवर मात करित उच्च शिक्षण आत्मसात केले . त्यांनी कौटुंबीक कार्यासह आजतागायत जन्मभूमी चिमूर ते कर्मभूमी मदनापूर सह चंद्रपूर जिल्यात केलेल्या शैक्षणिक क्रीडा क्षेत्रासह सामाजीक क्षेत्रात तन मन धनाने सेवाकरित केलेल्या कार्यात स्वतःची प्रगल्भता सिद्धतेमुळे स्थानीक ,राज्यस्तरीय पुरस्कार गौरवासह भारत भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले . विविध उपक्रम व अभियानात सहकार्य उत्कृष्ट भूमीका व सामाजिक हितार्थ उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी रुजविली सक्रीय सहभागाने उल्लेखनीय कार्य केले . त्यांच्या तज्ञ मार्गदर्शक, क्रीडा संयोजक, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, समाज नेतृत्व अशा बहुआयामी चतुरस्थ गुणांची ए. आय .एस . एफ . वैद्यकीय समीतीने दखल घेत त्यांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांची भारत भूषण पुरस्कारासाठी निवड झाली होती सदर सन्मान पुरस्कार प्रदान समारंभ नुकताच सभांजीनगर येथे पार पडला .
श्रीं बावणकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र झाडे ऊपाध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य , किशोर वरभे, डॅा. ज्ञानेश हटवार जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती चंद्रपूर , पुरुषोत्तम टोंगे, राकेश पायताडे, श्री बि. ए . जिवतोडे मुख्याध्यापक, विनोदभाऊ पिसे मुख्याध्यापक साईबाबा विद्यालय आमडी, शिक्षकवृंद , स्नेही समाजबांधवाकडून अभिनंदन करण्यात आले.