रामनगर पोलिस स्टेशनमध्ये बैठक संपन्न .!
चंद्रपूर (वि.प्र.) - चंद्रपूर येथील रामनगर पोलिस स्टेशन येथे मस्जिद पदाधिकारी,धर्मगुरू ची आज संध्याकाळी ७.०० वाजता बैठक घेण्यात आली.या मीटिंग मध्ये मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित हि हजर होते.
११ जानेवारी रोजी मंदिराजवळ मॉक ड्रिल रिहर्सल रंगीत तालीम झाली. तेव्हा विभागातील काही कर्मचारी कडून अति उत्साहात कोणतेही वेगळे उद्देश नसतांना अनावधानाने नारेबाजी झाली. व तो व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये वायरल झाल्याने एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने समाजातून प्रशासन विषयी नाराजी चा सुर येऊ लागला होता हा प्रकार पोलिस विभागच्या लक्षात आल्याने हि बैठक बोलवण्यात आली.
या बैठकीला चंद्रपूर पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार सह रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेश मुळे हजर होते .चंद्रपूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी बैठकीत मॉक ड्रिल विषयीची संपूर्ण माहिती देत समाजाच्या भावना दुखावण्याचा पोलिस प्रशासनाचा हेतू नव्हता परंतु अनावधानाने हि नारेबाजी चा प्रकार घडल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली.
कोणतेही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कशे समोर जावे या साठी मॉक ड्रिल ची रिहर्सल अशी रंगीत तालीम पोलिस विभाग कडून घेतली जाते.माँक ड्रिल रिहर्सल दरम्यान अनइंटेशनली हा प्रकार घडला असला तरी या बाबत सखोल चौकशी सुरू आहे.पोलिस विभागाकडून कधीही दूजाभाव (PARTIALITY) केला जात नाही असे स्पष्टपणे सांगून सर्वांना दिलगिरी व्यक्त केली व पोलिस विभागातर्फे माफी मागितल्याने बैठकीत उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले. व आपला चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे व सर्वधर्म समभावमुळे या जिल्ह्याचे नावलौकिक असल्याने सर्वांनी शांतता कायम ठेवावी अशी विनंती बैठकीत उपस्थित मान्यवरांनी केली असून.आम्ही सर्व आपल्या जिल्ह्याची शांतता कायम ठेवण्यास सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी उपस्थितांनी ग्वाही दिली.
अनावधानाने घडलेल्या या प्रकारचे कोणीही वेगळे अर्थ काढू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची विनंती या प्रसंगी करण्यात आली.