भद्रावती (ता.प्र.) - तालुकास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन शिंदे स्पोर्टिंग क्लब भद्रावती द्वारे करण्यात आले आहे. तालुकास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धा चे उद्घाटन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
स्वर्गीय नीलकंठराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ शिंदे स्पोर्टिंग क्लब भद्रावती द्वारे एक दिवशीय तालुकास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात आज दिनांक 22 / 1 / 2023 ला करण्यात आले आहे. या हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे हे उद्घाटक , तर प्रमुख अतिथी डॉ. कार्तिक शिंदे, डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , प्राचार्य एम. यु. बरडे, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते .
या तालुकास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तालुक्यातील 20 विविध संघांनी भाग घेतला आहे. या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 5000 रुपये, द्वितीय 3000, तृतीय 2000 रुपये आहे . या क्रीडा स्पर्धेसाठी आयोजक म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार, विशाल गौरकर, प्रा.माधव केंद्रे , मनोज बांदुरकर , जयश टेके, अक्षय राय , प्रथमेश सातपुते, सचिन मिलमिले यांनी सहकार्य केले.