चंद्रपुर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचं दुःखद निधन.!
बल्लारपुर (का.प्र.) - आज सकाळी पहाटे ह्रुदयविकाराच्या झटक्याने त्यांनी घेतला अखेरचा निरोप. वरोरा भद्रावती मध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अगदी साधी राहणी असणारा, निर्वव्यसनी, परखड विचार ठेवणारा राजकीय नेता म्हणून ओळख असणारे व दोन टर्मला आमदार व विधानसभेचे उपसभापती यशस्वी कारकीर्द केलेले अँड मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज पहाटे सकाळी ह्रुदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
रोकठोक विचारसरणी व सर्वसामान्य लोकांना आपलेसे वाटणारे अँड मोरेश्वर टेमुर्डे हे अनेक जातीसमूहाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहायचे त्यांनी शेतकरी संघटनेत मोठे योगदान देऊन आपल्या समर्थकांची मोठी संख्या निर्माण केली दरम्यान त्यांच्यावर जिएमआर वर्धा पॉवर कंपनीविरोधातील आंदोलनात कारागृहात सुद्धा जावे लागले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने वरोरा भद्रावती तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.