भद्रावती (ता.प्र.) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व सिलंबम,(लाठी काठी) स्पोर्ट्स असोसिएशन गोंदिया द्वारा आयोजित विभाग स्तरीय शालेय सिलंबम क्रीडा स्पर्धेत कु.कन्यका राऊत हिने प्रथम क्रमांक पटकावत तिची राज्यस्तरावर निवड झाली आहे. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील वर्ग ११ वी कला शाखेत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी कन्यका प्रदीप राऊत हिने डबल स्टीक सिलंबम विभागीय क्रिडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत नागपूर विभाग स्थरावर प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली.
सिलंबम या क्रीडा प्रकारात कन्यका राऊत हिची राज्यस्तरीय निवड झाल्याने भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार, शेखर जुमडे, किशोर ढोक, किशोर चौधरी, राजेंद्र साबळे, अतुल गुंडावार, अनिल मांदाडे, डॉ. प्रशांत पाठक, शुभम सोयाम, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.