खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते चंदनखेडा, टेंभुर्डा येथे आरोग्य मेळाव्याचे उदघाटन.!
भद्रावती (ता. प्र.) - धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. लहान्या पासून तर मोठ्या पर्यंत आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काळानुसार सर्वानी आरोग्याबाबत तडजोड न करता आरोग्यासाठी वेळ काढण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
आज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भद्रावती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चंदनखेडा व वरोरा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे टेंभुर्डा येथे सेवा सप्ताह व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी खासदार बाळू धानोरकर बोलत होते.
भद्रावती तालुका काँग्रेस चंदनखेडा येथे भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, सरपंच नयन जांभुळे, काँग्रेस नेते सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, भानुदास गायकवाड, सुमित मुडेवार, ईश्वर धोटे, सलाम शेख, डॉ. सतीश रींगने, पंडित लोंढे यांची तर वरोरा तालुका काँग्रेस तर्फे टेंभुर्डा येथे वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजू चिकटे, रवींद्र धोपटे, सरपंच ठाकरे, अरुणभाऊ बरडे, सुरेश टेकाम, लक्ष्मण बैस, राजाभाऊ असुटकर, मयूर वीरूटकर, हरीश जाधव, संजय घागी, राजू निखार, डॉ. रोहन धोबडे यांची उपस्थिती होती.
त्यासोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. तरीसुद्धा स्वतःजवळचा असलेला पैसा खर्च करून लोक खाजगी रुग्णालयात जात असल्याचे निदर्शनास येते. हे चित्र बदलविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करून समर्पक भावनेने सेवा दिली तर लोकांचा ओढा निश्चितच वाढेल. या दृष्टीने आरोग्य विभागाने काम करावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
टेंभुर्डा येथे आशा हॉस्पिटल, नागपूर तर चंदनखेडा येथे मेघे सावंगी यांनी आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषोधोपचार केला. उदघाटन प्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान करून घेतले.