विभागीय पुरोगामी पत्रकार सम्मेलनात केले प्रतिपादन.!
बल्लारपुर (का.प्र.) - दोन माणसं देश विकत आहेत,दोन माणसं देश खरेदी करत आहेत...देशात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा पसरविण्याचे कामं नियोजित पद्धतिने सुरु असून त्याला बहुजन समाज मोठ्या संख्येने बळी पडत आहे.अंधश्रद्धेच्या विरुद्ध आवाज उठवविणाऱ्या शाम मानव यांना कलबुर्गी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची चिंता माजी केबिनेट मंत्री आमदार विजय वड्डेटीवार् यांनी व्यक्त केली.ते बल्लाळशाह नाट्यगृह बल्लारपूर येथे आयोजित पुरोगामी पत्रकार संघाच्या विभागीय सम्मेलनात उद्घाटक म्हणून बोलत होते.दरम्यान त्यांनी चर्चित बागेश्वर् महाराजांचा खरपूस समाचार घेतला. पुढे बोलतांना ते म्हणाले कि सोशल मीडिया अभिव्यक्तिचे प्रभावी माध्यम बनले असून पुरोगामी विचारांचे पत्रकार आज प्रामाणिकतेणे लिहत आहेत.पुरोगामी या शब्दाचा अर्थ म्हणजेच 'अगुवा' पुढे चालणारा,विज्ञानवादी विचारांना स्वीकारून नेतृत्व करणारा. या पुरोगमी विचारानेच देश प्रगती करू शकतो,असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार् ठाकरे,प्र.के.अत्रे,गौरी लंकेश यांच्या प्रतीमांना माल्यार्पण करून् कार्यक्रमाला सुरुवात करण्यात अली.या वेळी प्रकाश देवतडे,करीमभाइ,एड.योगिता रायपूरे,निलेश ठाकरे,पवन भगत,नरेंद्र सोनारकर, सुजय वाघमारे मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमा नंतर करावके गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात अनुक्रमे पहिला पुरस्कार ३ हजार रोख,प्रश्स्तति पत्र,सन्मान चिन्ह अजिंक्य तायडे वणी, द्वितीय पुरस्कार २ हजार रोख,प्रश्स्ती पत्र,सन्मान चिन्ह कुमुद रायपुरे पोंभुर्णा यांना तर तृतीय १ हजार रोख,प्रशस्ती पत्र,सन्मान चिन्ह सुभाष चालखुरे चंद्रपूर यांनी पटकावला.प्रोत्साहनपर पुरस्कार रोख ५ शे रुपये,प्रशस्ती पत्र अनुक्रमे मो.रफिक शेख बल्लारपूर,प्रज्वल वनकर चंद्रपूर,स्नेहल शिरसाट यांना प्रदान करण्यात आले.
दुपारी ३ वाजता पुरोगामी पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरव समारंभ पार पडला यात पोलीस विभागात कर्तव्य दक्षतेने काम करणाऱ्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक विजय मुके,शैक्षणिक क्षेत्रातुन राकेश पायताडे,साहित्य क्षेत्रातुन हिंदी हास्य कवी अन्नू मातंगी,प्रा.विनय कवाडे यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला.दरम्यान संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुरोगामी पत्रकारांनी आपल्या लेखन्या सज्ज पुरोगामी विचारांची मशाल कायम स्वरूपी तेवत ठेवण्याचे आवाहन केले. ४:३० "वर्तमान भारतीय राजकारण आणि पत्रकारिता" या विषयावरिल् परीसंवादात एड.योगिता रायपूरे यांनी आपले परखड मत यक्त केले.सायंकाळी ५ वाजता "महिलांची पारंपारीक समूह नृत्य स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती.यात प्रथम क्रमांक गौरी बचत गट यांना तर द्वितीय क्रमांक लोभा ग्रुप व संघर्ष महिला बचत गट या दोन गटात तर तृतीय क्रमांक प्रेम बचत गट व् विद्या महिला बचत गट या दोन गटात वाटून देण्यात आला.रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सायंकाळी ७ वाजता "पुरोगामी महाषांचे विचारच भारतीय लोकशाही आणि स्वातंत्र्याला तारू शकतात" या विषयावरिल परीसंवादात डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी अभ्यासपूर्ण विश्लेशन केले.रात्री ८ वाजता मृणाल कांबळे यांच्या अध्यक्षतेत "पुरोगामी कवी सम्मेलन" आयोजित केले होते.कवी सम्मेलनाचे यशस्वी सूत्र संचालन एड.योगिता रायपुरे यांनी केले.या कवी सम्मेलनात अनेक कवीनी आपल्या उत्कृष्ठ रचना सादर केल्यात दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
रात्री ९ वाजता पुरस्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात होता.यात मुक्त पत्रकार लिमेश जंगम यांना त्यांच्या निर्भीड पत्रकारिते साठी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता गौरव पुरस्कार-२०२३", डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या सामाजिक,शैक्षणीक योगदानासाठी " राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार-२०२३" प्रदान करण्यात आला.तर शैक्षणीक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बद्दल एड.योगिता रायपूरे यांना "क्रांतीजोती सावित्रीआई गौरव पुरस्कार -२०२३" प्रदान करण्यात आला.सन्मान पत्र आणि गौरव चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार स्विकारल्या नंतर गौरवमुर्तिनि भावनिक उत्तर दिले..!
"जिजाऊ गौरव पुरस्कार मिळाल्याने जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. - डॉ.अभिलाषा गावतुरे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता गौरव पुरस्कार माझ्या साठी नोबेल पुरस्कारा पेक्षा कमी नाही - पत्रकार लिमेश् जंगम
क्रांतीज्योति सावित्रीआई गौरव पूरस्कार मिळाल्याने काम करण्याची ऊर्जा वाढली" - एड.योगिता रायपूरे
या विभागीय सम्मेलनात गोंदिया,भंडारा,यवतमाळ,नागपूर येथून पुरोगामी पत्रकार संघांचे पत्रकार मोठया प्रमाणात उपस्थित होते.
रात्री स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे भारदस्त सूत्र संचालन प्रा.विनय कवाडे तर आभार प्रदर्शन सूजय वाघमारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे सहकार्य लाभले.