शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजेंद्र झाडे यांना निवडून द्या - आ. कपिल पाटील


भद्रावती (ता.प्र.) - नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होऊ घातलेली आहे. या निवडणूकीत अनेक उमेदवार उभे आहेत. यात शिक्षकांची समस्या सोडवण्याची धमक असलेल्या राजेंद्र झाडे यांनाच विजयी करावे, असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केलेले आहे.
उद्या होणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राजकीय पक्ष समर्थित उमेदवार उभे आहेत. या आधी आपण दोन्ही राजकीय पक्षांचे शासन अनुभवले आहे. त्यांनी आपल्या सत्ता काळात शिक्षकांच्या किती समस्या सोडविल्या हे आपणाला माहितच आहे. ते जेव्हा विरोधात बसतात तेव्हा त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची आठवण होते. मात्र सत्तेत असताना त्यांना आपल्या प्रश्नाचे आठवण येत नाही व तिजोरी खाली होईल असे उत्तर मिळते.


मात्र शिक्षकांना त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष समर्थित उमेदवार विधानसभेत आवाज उठवत नाही, ही वास्तविकता आपण अनुभवलेली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवाराला डावलने आपल्या हातात आहे ही संधु गमवल्यास आपणाला सहा‌ वर्ष पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार.
 तेव्हा कुठल्याही राजकीय पक्ष समर्थित उमेदवाराला मतदान न करता शासन मान्य संघटना शिक्षक भरतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनाच आपण आपले प्रश्न सभागृहात मांडून सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यावे. नागपूर विभागात साहा ही जिल्ह्यात प्रचारात राजेंद्र झाडे यांनी आघाडी घेतलेली असून ते निश्चितच निवडून येणार आहेत, असे राजकीय वीश्लेषक सांगतात. जुनी पेन्शन प्राप्त करण्यासाठी, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व शिक्षणव्यवस्था कायम टीकवून ठेवण्यासाठी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले.


जुनी पेंशन व आपल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण राजेंद्र झाडे यांनाच 1 पसंतीचे मतदान देवुन विजयी करा.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.