नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मध्यवर्ती बँक चंद्रपूर संचालक रविंद्र शिंदे यांनी दिली मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी.!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या वतीने स्व. निळकंठराव शिंदे यांच्या व्दितीय पूण्यतिथी प्रित्यर्थ दि. 15 जानेवारी रोजी "मित्रत्व" या संकल्पनेवर आधारित 'रन फॉर फ्रेंडशिप मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले . त्याकरिता व्यासपीठावर भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष तथा या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, सदस्य डॉ. वैभव शिंदे, सदस्य प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे. सदस्य दिलीप शिंदे, अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती, अविनाश सिधमशेट्टीवार, डॉ. केशवानी , डॉ. बांदुरकर, बंग, सौ. सुलभाताई मद्दिवार, पोलीस निरीक्षक भारती, प्रशांत शिंदे, रविंद्र शिंदे संचालक मध्यवर्ती बँक चंद्रपूर, माजी नगरसेवक अफजलभाई, डॉ. धनराज अस्वले, डॉ. प्रिया शिंदे, श्वेता शिंदे, प्रा. सौ. रोशनी शिंदे इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितितांना मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक डॉ. विवेक शिंदे यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजनाचे उद्देश्य सांगत यावर्षी मॅरेथॉन रन फॉर फ्रेंडशिप या ब्रीद वाक्यावर आयोजित करण्यात आली. त्यात जाती ,धर्म ,वर्ण ,गरीब ,श्रीमंत ,स्त्री, पुरुष, शिक्षित ,अशिक्षित या सर्व भेदाच्या पलीकडे एकतेच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीच्या नात्याची जपणूक व्हावी हा उदात्त हेतू लक्षात घेऊन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेला शाळा, विद्यालय, महाविद्यालय, बँक, हॉस्पिटल, नगर परिषद, रोटरी क्लब, जेष्ठ नागरिक संघ, योगासन ग्रुप, सायकलिंग ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप, विवीध संघटना, त्यातील विविध वर्गातील मुले मुली, तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.
सर्वप्रथम विवेक शिंदे व उपस्थितांच्या हस्ते हवेत फुगे सोडून मैत्रीच्या एकात्मतेचे प्रतीक दर्शवले व त्यानंतर लगेच सर्व स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवत मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात ही यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या भव्य प्रमाणातून झाली. मॅरेथॉन चा मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत गणेश मंदिर गवराळापर्यंत व परत विद्यालयाच्या प्रांगणापर्यंत असा मार्गक्रमण होता. त्यात सर्वांनी हिरहिरीने भाग घेत मैत्रीचा संदेश दिला. या मॅरेथॉन स्पर्धेमुळे भद्रावती व सभोवतालचा सर्व परिसर मैत्रीमय झाला होता. या स्पर्धेत मार्गावर पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच एन .एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.
या मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमधून कु. प्रणाली संजय चौधरी प्रथम आली असुन कु. सुहानी मुरलीधर शिरपूरकर द्वितीय तर कु. मंजुश्री अभय नक्षीने तृतीय आली आहे. त्याच प्रमाणे मुलांमधून प्रथम क्रमांक करण कचरू बावणे तर द्वितीय श्रुतीक अशोक कारमेंगे, तृतीय शिवम पांडुरंग कुंभारे यांनी विजयाचा मान मिळवीला आहे.
या सर्व विजेता स्पर्धकांना डॉ विवेक शिंदे , डॉ कार्तिक शिंदे , डॉ. विशाल शिंदे , डॉ प्रिया शिंदे , श्री अनिल धानोरकर , प्राचार्य जयंतराव वानखेडे , प्राचार्य एल एस लडके लडके, यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत आबाल वृध्द स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.
सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्याकरिता भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय , वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
मॅरेथॉन स्पर्धेचे संचालन प्रा डॉ सुधीर मोते तर आभार प्रदर्शन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव कार्तिक शिंदे यांनी केले.