भद्रावती (ता. प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोडल अधिकारी डॉ. विजय टोंगे यांनी शपथ दिली. त्या अनुषंगाने विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. त्यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मान्यवरांनी राष्ट्रीय मतदान दिनाचे महत्त्व व कार्य समजावून सांगितले. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नोंदणी करण्याचे व प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक लघुपट दाखविण्यात आला. पथनाट्य सादर करण्यात आले. या निमित्ताने आयोजित एका सभेत निवडणूक साक्षरता क्लब ची स्थापना करण्यात आली. कु. आचल झाडे, दिपाली चिकटे, ओम आत्राम, राणू नागपुरे, तनु कटारे, राजेश शेट्टी, निकिता भागवत, वैशाली लांबोळे, सौरभ चामाटे इत्यादींचा कार्यकारिणीत समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी डॉ. विजय टोंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.