भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ चे भव्य आयोजन तथा ऑल इंडिया मुशायरा कवी संमेलन कार्यक्रम.!
बल्लारपुर (का. प्र.) - राष्ट्रीय साप्ताहिक चंद्रपुर का रहेबर वृत्तपत्राच्या ९ वा वर्धापन दिनानिमित्त भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया, अहले कलम पत्रकार बहाउद्देशिय मंच, चंद्रपुर, तहजिब ए अदब बहुभाषिक शिक्षण बहुउद्देशिय सेवा संस्था, चंद्रपुर मौलाना आझाद महिला बहुउद्देशिय संस्था, नगीनाबाग, चंद्रपुर, चंद्रपूर का रहेबर, मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशिय सेवा मंच, चंद्रपुर, मा. अय्युबभाई कच्छी बहुउद्देशिय सेवा मंच, चंद्रपुर, रुथ महिला बहुउद्देशिय सेवा मंडळ, दादमहल वार्ड, चंद्रपुर, सर सय्यद अहेमद खाँ सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुरद्वारा अय्युब भाई कच्छी यांच्या नेतृत्वात मागील २२ वर्षापासुन समाज सेवा करणारे समाज सेवक, शिक्षक, डॉक्टर, आमदार, खासदार, नगर सेवक, ग्राम सेवक, पोलीस पाटील, बहुउद्देशिय सेवा संगिगी, इंजिनियर, विद्यार्थी, लेखक, साहित्यीक, चित्रकार, पत्रकार समाज सेविका, गायक, शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पंचायत समिती सदस्य, रंगमंच कलाकार, नाटककार, खेळाडु, आरोग्य सेवक व सर्व प्रकारचे समाज कार्य करणारे व्यक्ती व सामाजिक सेवा संस्था आणि इतर निस्वार्थ सेवा कार्य करणारे सेवक यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप मोमॅन्टो (शिल्ड) शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र (सर्टीफिकेट) देण्यात येत असुन यासाठी दिनांक ०५/०२/२०२३ पर्यंत अर्ज त्वरीत सादर करावे. विशेष मान्यवर यांच्या हस्ते दिनांक २६/०२/२०२३ ला रविवार प्रियदर्शनी सभगृह, चंद्रपुर येथे राज्यस्तरीय पुरस्कार व पत्रकाराची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे.
अर्ज या प्रकारे करावे, अहले कलम पत्रकार बहुउद्देशिय मंच संयुक्त ७ सामाजिक सेवा संस्था आयोजक/अध्यक्ष अय्युब भाई कच्छी संस्थापक/अध्यक्ष संपर्क ८७६६८२८१८८, ९४२१८७६९७२, शोएब कच्छी ८६५७०४०४१५, ८६६८३०९४२३ आणि अर्जदार यांनी समाजकार्य केलेल्या बाबतचा बायोडाटा, पेपर कात्रण, आधार कर्ड, दोन पासपोर्ट फोटो व इतर माहिती त्वरीत सादर करावे, असे आव्हाण एका पत्रकाद्वारे मुख्य आयोजक तथा मार्गदर्शक अय्युबभाई कच्छी यांनी कळविले आहे.