बल्लारपूर (का.प्र.) - चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर आणि महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून २६/११/२०२० ला महाजनकोने करार CSTPS मॉडेल PPP बंधारा झरपट नदीच्या पात्रात उत्खनन करून बांधत आहे. त्यामुळे झरपट नदी आणि इराई नदीच्या आजू-बाजूच्या परिसरात माघील १९८६, २००६, २०१२-१३ व २०२२ मध्ये पठाणपुरा, दादमहल, काझीपुरा, काळाराम मंदिर, आदिवासी मोहहला किसान वसाहत ठक्कर कॉलनी, मिलिंद नगर, टायर वसाहत त्याचप्रमाणे भिवापूर मधील भंगाराम, माता नगर भिवापूर इत्यादी ठिकाणी पूरयेतो व नागरिकांच्या घरात ८ ते १० फूट पाणी साचते त्या मुळे घराची पतझळ, जनजीवन विस्कळीत व अन्नधान्याचे नुकसान होते. चंद्रपूर महानगरपालिका नगररचना विभागा आणि चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर कडून कोणत्याही प्रकारचा अभिप्राय न घेता निविदा काढणे व आपसात करार करणे हे अभिप्रित न्हवते. हे बांधकाम गोंडराजा किल्ल्याला लागून आहे तरी पुरातत्व विभागाची परवानगी न घेता बांधकाम माघील दिड वर्षा पासून सुरु आहे या काम मुळे किल्ल्याला क्षती पोहचून किल्ला खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा करार २५ वर्षाचा असून यात मनपा १९.७३ कोटी, राज्य शासन १९.७३कोटी व केंद्र शासन ३९.४४ कोटी अटल मिशन अंतर्गत खर्च करीत आहे. विश्वराज इन्व्होर्मेन्ट मॅनेजमेन्ट प्रा. ली. हि कंपनी झरपट नदी नसून नाला आहे अशी नागरिकांची दिशा भूल करीत आहे. नदी पात्रात बंधारा बांधून महाजनकोला पाणी प्रक्रिया करून देणे आणि त्यांच्या कडून स्वछ पाणी घेणे असा करार नसून चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मलनिःसारण (सांडपाणी) प्रक्रिया करून जे पाणी साठविले जाईल त्याला महाजानकोला देऊन त्यांच्याकडून स्वछ पाणी घेण्याचा करार केलेला आहे व कंत्राटदार कंपनीला हा प्रोजेक्ट चालविण्या करीता महाजानको कडून देयक मिळणार आहे.
दि. २०/०१/२०२३ ला जिल्हाधिकार चंद्रपुर, चंद्रपुर महानगरपालिका चंद्रपुर, महाऔश्निक केंद्र चंद्रपुर, चंद्रपुर पाठबंधारे विभाग, चंद्रपुर, चंद्रपुर खनिकर्म विभाग चंद्रपुर व पुरातत्व विभाग जिल्हा चंद्रपुर ला संबंधित विषयाची माहिती देण्याकरीत गेल्या असता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट झाली नाही परंतु चंद्रपूर पाठबंधारे विभाग चंद्रपूर चे कार्यकारी अभियंता शाम काळे व महाजनको चंद्रपूर चे अधिकारी शाम राठोड साहेब, सिविल इंजिनिअर मिलिंद रामटेके साहेब यांना सविस्तर माहिती दिली तेव्हा विषयावर चर्चा झाली या अधिकाऱ्यांनी येत्या २३/०१/२०२३ ला पंकज सपाटे साहेब, सी. जी. एम. महाऔष्णिक केंद्र चंद्रपूर यांच्या सोबत बैठक लावून चर्चेत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे पुरातत्व विभागाचे अधिकारी शिव कुमार यानि स्पॉट निरक्षण करीत बंधाराबघून गेले. महानगरपालिका चंद्रपूर आयुक्त यांच्या अनुपस्थितीत मध्ये चीफ अकाउंट ऑफिसर मनोहर बागडे यांच्या दालनात निवेदन देण्यास गेले तेव्हा सिटी इंजिनिअर महेश बारई, या मलनिःसारण प्रोजेक्ट चे इंजिनिअर अनिल घुमडे, अमृत योजनेचे इंजिनिअर विजय बोरीकर, झोन क्र. २ चे इंजिनिअर रवीद्र हज़ारे यांच्या सोबत झरपट नदी पात्रात बांधन्यात आलेला बंधारा मलनिःसारण (सांडपाणी) प्रक्रियेच्या पाण्यावर विस्तृत चर्चा झाली परंतु निवेदन घेण्यास नकार दिला आणि कानावर हात ठेवले व म्हणाले हा प्रोजेक्ट महाजनकोचा आहे आमचा यात कोणताही हस्तशेप नहीं. पूरग्रस्त क्षेत्रात अश्या पद्धतीचे काम करणे परिसरातील नागरिकांना मान्य नाही हे काम त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन केल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे निवेदन माजी नगरसेवक महाकाली प्रभाग १२ नंदू नागरकर, माजी नगरसेवक भिवापुर प्रभाग १४ वसंतजी देशमुख, माजी नगरसेवक भिवापुर प्रभाग सतीश घोनमोड़े यानि दिले.