'स्नेहसंमेलनातून कलागुणांना वाव मिळतो' - डॉ.विशाल शिंदे


यशवंतराव शिंदे प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च‌ प्राथमिक शाळा चिचोर्डी, सूर्यमंदिर वार्ड, भंगाराम वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'स्नेहसंमेलनातून कलागुणांना वाव मिळतो व सर्वांगीण विकास होते' असे अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ. विशाल शिंदे यांनी केले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा चिचोर्डी, सूर्य मंदिर वार्ड ,भंगाराम वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन संपन्न झाले.
डॉ. विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या प्रेरणेतून , तसेच डॉ. कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या मार्गदर्शनात दिनांक 19 जानेवारी 2023 रोज गुरुवारला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या इंडोअर स्टेडियम या इमारती मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सहसचिव डॉ. विशाल शिंदे तर औउद्घाटक राजू गैनवार ,माजी नगरसेवक ,प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. वानखेडे सर , मुख्याध्यापक प्रविन शिंदे, ताजने सर , मडावी सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये कला विषयक आवड निर्माण होऊ त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी व्यक्तिमत्व विकासात सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व असल्याचे सांगितले . या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, गीत गायन, नक्कल , नाटिका इत्यादी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तीनही प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शविला व कार्यक्रमाचा आनंद घेतला. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बोडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमराज झाडे सर यांनी केले .
या कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी, पालक यांनी आपली उपस्थिती दर्शवली . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक वृंद वेलेकर सर , आत्राम सर कार्लेकर मॅडम, विश्वास मॅडम, नान्हे मॅडम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.