विसरु सामाजिक-राजकीय भेद आणि आपल्या OBC (VJ, NT, SBC) च्या जनगणेसाठी होऊ या एक.!

बल्लारपुर (का. प्र.) - हा मुख्य उद्देश समोर ठेऊन सकल कुणबी समाज, वणी आणि OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी-मारेगाव-झरी च्या संयुक्त विद्यमाने ""संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज जयंती"" निमित्य संत साहित्याचे गाढे अभ्यासक, धर्म-संस्कृती व इतिहास-भाषा संशोधक "प्रा.डॉ. अशोक राणा, यवतमाळ" यांचे "'संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून आजचा शेतकरी-कष्टकरी, बहुजन(obc, vj, nt, sbc) समाज"" या विषयावर जाहीर प्रबोधनपर व्याख्यान गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 ला सायंकाळी 6:00 वाजता शेतकरी मंदिर सभागृह,वणी येथे मा. किरणताई देरकर,अध्यक्ष-एकविरा महिला नागरी पतसंस्था, मारेगाव यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेले असून उदघाटक म्हणून मा. प्रतिभाताई धानोरकर, आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र ह्या असणार आहे;तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून मा. संजय खाडे, अध्यक्ष-श्री रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी हे असून प्रमुख अतिथी म्हणून मा. आशिष खुलसंगे, अध्यक्ष-वसंत जिनिंग & प्रेसिंग फॅक्टरी, वणी, मा.प्रदीप बोनगीरवार, अध्यक्ष-obc(vj, nt, sbc) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी-मारेगाव-झरी, मा. विजय पिदूरकर, समन्वयक-राष्ट्रीय ओबीसी महासंघ, मा. प्रमोद इंगोले, अध्यक्ष-श्री नृसिंह व्यायाम शाळा, वणी हे राहणार आहे;तर obc(vj, nt, sbc) प्रवर्गामधील सर्व समाजाचे अध्यक्ष/सचिव/प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तरी ओबीसी जनगणनेशी सबंधीत असलेल्या या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी सर्व वणीकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे असे नम्र आव्हान सकल कुणबी समाज आणि OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.