रामनगर चपरासी काॅलनीतील गार्डन मध्ये योगा व आरोग्य शिबीर आरंभ.!

रामनगर चपरासी काॅलनीतील गार्डन मध्ये योगा व आरोग्य शिबीर सुरू जिल्हा महामंत्री सौ.अपर्णा चिडे यांची माहिती
बल्लारपुर (का.प्र.) - आज 14 ते 19 फेब्रुवारी पर्यंत आयोजित 7 ठिकाणी सात दिवसीय निशुल्क योगा प्राणायाम व आरोग्य शिबिराला सुरुवात झाल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा महिला पतंजली योग समितीच्या महामंत्री सौ.अपर्णाताई चिडे यांनी दिली असुन शिबिर दररोज सकाळी 6 ते 8 ज्या वेळेत डॉ.मुठाळ यांच्या दवाखान्याजवळील,चपरासी काॅलनीच्या गार्डन रामनगर, झोन क्र.2 मध्ये आहे. चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त श्री विपीन पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरात योग वर्गा सोबतच रोगमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आपले शरीर निरोगी व स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार,मनाची एकाग्रता,आनंदी जीवन,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या शिबिरांचे आयोजन डॉ.वनिता गर्जेलवार, डॉ.अश्विनी भारत ,आशा वर्कर -सुकेशनी शंभरकर,अंजु कोल्हेकर, प्रेमिला बावणे,मिर्झा सर आणि टीमच्या सहकार्याने आरोग्य शिबीरे याच ठिकाणी होत असल्याची माहितीही योग शिक्षिका सौ. चिडे यांनी दिली आहे. या संयुक्त उपक्रमाला महिला पतंजली योगा समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या तथा नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा प्रभारी सौ.स्मिताताई रेभनकर जिल्हा प्रभारी - नसरीन शेख आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिबिराचा दुसरा दिवस असुन शिबिरा मध्ये आज योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, आसने ,योगा प्राणायाम ,सूक्ष्म व्यायाम ,मुद्रांचा अभ्यास व प्रात्यक्षिके शिबीरार्थीं कडुन करुन घेण्यात आले. आजच्या शिबिराचा दुसरा दिवस आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला.
रोगमुक्त चंद्रपूर अभियाना तर्फे शिबिराला उपस्थित प्रत्येक साधक-साधिका यांचे आरोग्य तपासणी Weight, BP ब्लडप्रेशर,शुगर ची चाचणी (test) करण्यात आली शिबिराला 13 साधक -साधिका उपस्थित होते ..

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.