यशवंतराव शिंदे विद्यालयाचे सुयश .!

भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथील विद्यार्थी रुद्रकुमार खोब्रागडे याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (N.M.M.S) या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
सत्र 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन. एम. एम. एस.) शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी,भद्रावती येथील रुद्रकुमार खोब्रागडे या विद्यार्थ्याने 81.23 टक्के गुण मिळवून ही परीक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांला 15,000 रुपये शिष्यवृत्ती मीळणार आहे. 
यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथील रुद्रकुमार खोब्रागडे हा विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक( एन.एम. एम.एस.) या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, पर्यवेक्षक एम. एस. ताजने, उमेश पाटील , आर.एल. बनकर, ए.एम.देशमुख, डॉ. ज्ञानेश हटवार समस्त शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.