मराठीच्या समीक्षकांचा बहिष्कार कायम .!

भद्रावती (ता.प्र.) - नागपूर येथे विभागीय बोर्डाच्या मराठी विषयाच्या समीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित न राहता सर्व समीक्षकांनी बहिष्कारच्या निवेदनावर सह्या करून विभागीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.दिनांक २५/२/२३ रोजी नागपूर विभागीय मंडळात मराठी विषयाच्या नियामकांची सभा बहिष्कार आंदोलनामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही.सर्व नियामकांनी व मुख्य नियामकांनी बहिष्कार पत्रकावर स्वाक्षरी करून विजुक्टाचे सचिव डॉ.अशोक गव्हाणकर व मराठी विषय शिक्षक महासंघाचे चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष व मुख्य नियामक प्रा. श्री. धर्मराज आर. काळे सर यांनी सर्व समीक्षकांना मार्गदर्शन करून नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. चिंतामणजी वंजारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मराठी विषय शिक्षक महासंघाचे विविध भागातून आलेले पदाधिकारी, समीक्षक तसेच डॉ. विजय सोरते, डॉ. अभिजित पोटले, गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रा. पवन कटरे , भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रा. एम. डी गायधने , गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा.भाऊराव गोरे , प्रा. सूर्यकांत भोंगळे , शहर कार्याध्यक्ष डॉ. चेतन हिंगनेकर व आय.टी. संघटनेचे नागपूर विभाग अध्यक्ष प्रा.नितीन राऊळवार प्रामुख्याने उपस्थित होते. जोपर्यंत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत पेपर मुल्यांकनावर बहिष्कार कायम राहील असे डॉ. ज्ञानेश हटवार चंद्रपूर, विजया मन्ने गडचिरोली, संजय लेनगुरे भंडारा, सुरेश नखाते नागपूर तसेच मराठी विषय शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.