चिरादेवी येथे शिवजयंती उत्साहात साजरी .!

चिरादेवी येथे शिवजयंती उत्साहात साजरी, गावातून काढण्यात आली भव्य मिरवणूक .. तरूणाने शिवजयंती अंगात आणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामध्ये आणून शिवजयंती साजरी केली पाहिजे - प्रा. डॉ. जयवंत काकडे यांचे प्रतिपादन .!
भद्रावती (ता.प्र.) - तालुक्यातील चिरादेवी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिरादेवी गावातील ज्येष्ठ नागरिक मा. श्री. भाऊराव जी ढवस, कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते मा. श्री. प्रा. डॉ. जयवंत काकडे, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. प्रा. रमेश जी पारेलवार, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. शंकर ताजणे, जेष्ठ नागरिक बापुजी खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद उपरे, पोलीस पाटील बंडुजी जोगी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र कोंगरे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा. श्री. प्रा. डॉ. जयवंत काकडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नव्हते परंतु आजचे मावळे शिवजयंती साजरी करत असताना व्यसन करून साजरी करतात. तरूणाने अंगात आणून शिवजयंती साजरी करू नका तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामध्ये आणून शिवजयंती साजरी करा असे प्रतिपादन प्रा.जयवंत काकडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. पारेलवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 
शिवजयंती उत्साह निमित्त सकाळी ६ वाजता ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत मोरेश्वर जिवतोडे यांनी वेशभूषेतून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या अभियानात सरपंच मा. सौ.निरूपला ताई मेश्राम, उपसरपंच प्रदिप देवतळे, जि. प. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेश वाघदरकर, सहा. शिक्षक राजू चौधरी, सहा. शिक्षक अजय मुसळे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान छावा गृपचे सर्व पदाधिकारी, सदस्य, जि. प. प्राथ. शाळेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने या स्वच्छता अभियानात उपस्थित होते. 
त्यानंतर वत्कृत्व स्पर्धा व गायन स्पर्धा आयोजित केली होती. वत्कृत्व स्पर्धेत पहिल्या गटात वर्ग २ ते ५ यामध्ये प्रथम क्रमांक सुहाणी भोयर, द्वीतीय क्रमांक नैतिक कोंगरे, दुसरा गट वर्ग ६ ते१० च्या गटात प्रथम क्रमांक दर्शन दुर्वे त्यासोबत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेयस येरमे व संच परिक्षक म्हणून अजय मुसळे सर यांनी काम बघितले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख व्याख्याते मा.श्री.प्रा जयवंत काकडे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ चामाटे,प्रास्ताविक प्रदिप देवतळे तर आभार विजय खंडाळकर यांनी मानले. 
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत नयन ताजणे, स्वराज्य संस्थापक राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत कु. संजीवनी सातपुते तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिवाची बाजी लावून सेवा करणारे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या वेशभूषेत सक्षम मुठलकर होते. थोर पुरूषांच्या वेशभूषेतून नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर ताजणे, रमेश ताजणे, प्रदिप देवतळे, विजय खंडाळकर, सुनील काळे, विनोद उपरे, सौरभ चामाटे, कैलास चामाटे, अतुल आत्राम, महादेव मडावी, हरिदास बारतीने, विवेक काळे, मनोज खुटेमाटे, नागेश ताजणे, रविंद्र बदखल, गणेश कांबळे, प्रविण खुटेमाटे, निलेश बुरडकर, विनोद चटकी, सोहम काकडे, रूपेश ढवळे, श्रीकांत काळे, विलास आत्राम, राजू खांडाळकर, मोरेश्वर जिवतोडे, धिरज पिंगे, प्रकाश आत्राम,विजय आमने व समस्त गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. 

"जय लहरी जय मानव विद्यालय मदनापुर येथे १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप" .!

जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. 3 वर्षापासुन गुरु शिष्यांच्या अतुट बंधनातून सत्र 22- 23 सत्रातील वर्ग १०वी च्या ४३ विद्यार्थ्यांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून आठवणी व्यक्त केल्यात . यावेळेस संत लहरी बाबा शिक्षण संस्था विहिरगाव चे संस्थापक / सचिव परशुरामजी ननावरे , सहसचिव मधुकरजी दांडेकर, कोषाध्यक्ष महादेव मडावी, दादाजी जीवतोडे, मुख्याध्यापक भक्तदासजी जिवतोडे , सौ.गिताताई श्रीरामे संरपच, डॉ. शुभांगी तांबे, वामनराव भरडे, उद्धवराव चौधरी, किसनजी दांडेकर, हरिश्वंद्र श्रीरामे व्यासपीठावर उपस्थित होते .
वर्ग १० चे विद्यार्थी जयश्री गुरनुले शालेय मुख्यमंत्री, सुरज अलाम, छकुली चौखे, शिवानी गेडाम, अनिका घरत, पवन रंदये, अजय जिवतोडे यांनी आपले अनुभव कथन केले . वर्ग ९ची कु. विद्या दडमल व गणेश घरत यांनी परिक्षेच्या शुभेच्छा दिल्या. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेल स्वर्गीय प्रंतप्रधान इंदिरा गांधी जय लहरी जय मानव विद्यालय मदनापुर येथे १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप 3 वर्षापासुन गुरु शिष्यांच्या अतुट बंधनातून सत्र 22- 23 सत्रांतील वर्ग १०वीच्या ४३ विद्यार्थ्यांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून आठवणी व्यक्त केल्यात . यावेळेस संत लहरी बाबा शिक्षण संस्था विहिरगाव चे संस्थापक / सचिव परशुरामजी ननावरे , सहसचिव मधुकरजी दांडेकर, कोषाध्यक्ष महादेव मडावी,दादाजी जीवतोडे, मुख्याध्यापक भक्तदासजी जिवतोडे , सौ.गिताताई श्रीरामे संरपच, डॉ. शुभांगी तांबे,वामनराव भरडे, उद्धवराव चौधरी, किसनजी दांडेकर, हरिश्वंद्र श्रीरामे व्यासपीठावर उपस्थित होते .
वर्ग १० चे विद्यार्थी जयश्री गुरनुले शालेय मुख्यमंत्री,सुरज अलाम, छकुली चौखे,शिवानी गेडाम, अनिका घरत, पवन रंदये, अजय जिवतोडे यांनी आपले अनुभव कथन केले . वर्ग ९ची कु.विद्या दडमल व गणेश घरत यांनी परिक्षेच्या शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतीमा, सुंदर वॉल फोटो व घडी भेट दिली . मान्यवर व शिक्षकांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पेनचे वितरण करण्यात आले . प्रतीमा, सुंदर वॉल फोटो व घडी भेट दिली . मान्यवर व शिक्षकांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पेनचे वितरण करण्यात आले . परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
                         

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.