राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न .!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न .!
भद्रावती (वि.प्र.) - भद्रावती स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे संपन्न झाले.या शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एल एस लडके उद्घाटक भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्रा डॉ कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी सौ संगीता खिरटकर सरपंच चोरा, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजर श्री सावनकर सीडीसीसी बँक मॅनेजर श्री खंगार उपसरपंच श्री विलास जीवतोडे, ग्रामसेवक श्री शिरपूरकर सौ सईबाई गायकवाड अध्यक्ष तंटामुक्ती चोरा व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने व विभा तातेड तन्वी झोडे यांच्या स्वागत गीताने व आफरीन शेख विभा तातेड, तन्वी झोडे, प्रांजली बिस्वास, कृतिका दिपाली, प्रांजली रायपुरे याच्या एन एस एस गीताने झाली.सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून देशाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासात खेड्याची भूमिका या संकल्पनेवर आधारित तसेच या शिबिराचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे हा एन एस एस चा मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट केले.
याप्रसंगी या उद्घाटनिय कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांनी आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना शिकवत असताना अभ्यासासोबतच इतरांना मदत करणे शिकवले पाहिजे की ज्या मदतीमुळे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणले पाहिजे तसेच आज देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम खेड्यांचा विकास केला पाहिजे असे आपले मत व्यक्त करीत या शिबिराचे रीतसर उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर श्री सावनकर यांनी एन एस एस च्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना या शिबिरातून चांगले गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी चोरा येथील सरपंच सौ संगीता खिरटकर यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षणाचे महत्त्व तसेच जास्तीत जास्त मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे याचे आवाहन केले.स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथील मुख्याध्यापक श्री एम यु बर्डे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांसोबत मैत्री करून आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत तसेच आई-वडिलांसोबत रोज संभाषण करणे आजच्या काळाची गरज आहे असे आपले मत व्यक्त केले.
या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या देशाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासात खेळाचे भूमिका या संकल्पनेवर प्रकाश टाकीत महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या नाऱ्या मागचा उद्देश स्पष्ट करीत अशा प्रकारच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे ते शिकता येते व जीवन हे संघर्षमय आहे त्या संघर्षावर मात करीत चांगले जीवन जगले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्रा कुलदीप भोंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा सचिन श्रीरामे डॉ के पी जुमडे श्री शरद भावरकर, विभा तातेड यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.