सामाजिक प्रबोधन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन .!

युवकांनी संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घ्यावा : एड. गणेश हलकारे
बल्लारपुर (का.प्र.) - संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर बामणी व बल्लारपूर तालुका शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, जगद्गूरु संत तुकाराम महाराज व कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक प्रबोधन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते अँड. गणेश हलकारे, अमरावती ,यांनी संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांचे सामाजिक कार्य व आजच्या युवकांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करतांना, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे व विचारांचे दाखले देत आजच्या युवकांनी सुद्धा काळ ओळखुन जशास तसे पण विचारपूर्वक वागायला शिकावे. तसेच शिवरायांच्या विचारानुसार असलेल्या आपल्या संविधानाचा सन्मान ठेवून आपल्या हक्क , अधिकार व जबाबदारी यासाठी नेहमी जागृत असावे, असे युवकांना आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पि. यू. जरीले व कार्यकारी मंडळ,यांचे हस्ते, नवनिर्वाचित शिक्षक आमदार माननीय सुधाकरराव अडबाले , नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पि यु जरीले,अध्यक्ष संत तुकाराम महाराज सेवा मंडळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रजनीताई हजारे ,प्रा एल. के. बलकी प्रा. एन. के‌. लिंगे, श्री कुर्मदास काळे, श्री बाबुरावजी वैद्य, श्री मुरलीधर झाडे, श्री उद्धवराव धोटे, श्री मनोहरराव जीवतोडे, प्राचार्य अनिल शिंदे यांची उपस्थिती लाभली.
सत्कार समारंभ कार्यक्रमात संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, विदर्भ ज्युनिअर टीचर असोसिएशन, यंग टीचर्स असोसिएशन, नुटा, बल्लारपूर तालुका मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, उर्दू तेलगू शिक्षक संघ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, आयटीआय संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, कॉन्व्हेंट टीचर संघटना, जीवनगौरव बहुउद्देशीय संस्था, जमाते इस्लामी हिंद संस्था, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, श्री चंद्रभानजी जोगी, श्री शामसुंदर धांडे इत्यादींनी सत्कार कार्यक्रमात सहभाग घेतला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, अध्यक्ष श्री पि. यु. जरीले, उपाध्यक्ष प्रा.एम. यु. बोंडे, प्रा राजेंद्र खाडे, श्रीमती कमलताई वडस्कर, श्री विनायक साळवे, श्री मनोहर माडेकर, श्री गजानन घुगुल, प्रा. युगराज बोबडे, श्री के. एम. पोडे, श्री भास्कर वडस्कर, श्री कुणाल कौरासे, श्री अतुल बांदुरकर, श्रीमती वंदना पोटे, श्रीमती किरण बोबडे,श्रीमती सोनाली काकडे, श्री अनिल वागदरकर प्रा. रवींद्र साळवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खाडे व सूत्रसंचालन मनोहर माडेकर यांनी तर आभारप्रदर्शन विवेक खुटेमाटे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.