बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती स्थानिक निळकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या बौद्धिक कार्यक्रम सत्राचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सहसचिव प्रा विशाल शिंदे मार्गदर्शक श्री पांडुरंग टोंगे श्री विवेक शिरसागर रामेश्वर बिडवाई नायब तहसीलदार भद्रावती श्री रत्नपारखी श्री चीदमलवार तहसील कार्यालय भद्रावती प्रा संदीप प्रधान प्रा सचिन श्रीरामे प्रा डॉ किरण जुमडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
याप्रसंगी भद्रातील शिक्षण संस्था भद्रावतीच्या सहसचिव प्रा डॉ विशाल शिंदे यांनी खेळाचे व्यक्तिमत्व विकासात महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना जसे शालेय जीवनात अभ्यासाचे महत्त्व आहे तसेच खेळाचे सुद्धा महत्त्व आहे की ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते त्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास होतो जर आपण निरोगी राहू तर आपला समाज आपले राष्ट्र निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे आपली प्रगती होते असे मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच रामेश्वर बिडवाई नायब तहसीलदार भद्रावती यांनी नव मतदार जनजागृती व नोंदणी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मतदार नोंदणी जास्तीत जास्त करण्याच्या आवाहन केले.श्री पांडुरंग टोंगे माजी सरपंच भद्रावती यांनी दुग्ध व्यवसाय यावर मार्गदर्शन करीत दुग्ध व्यवसाय संबंधित सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे संचालन हिताक्षी ठेगणे व मिलिंद ऊगे तर आभार प्रदर्शन साहिल लांडगे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रा संदिप प्रधान सचिन श्रीरामे प्रा डॉ किरण जुमडे श्री प्रमोद तेलंग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.