मातंग समन्वय समिती द्वारे सामाजिक चर्चासत्राचे आयोजन.!
रविदास महाराजांचे विचारांची आज खरी गरज -भानुदास जाधव
जिवती (वि.प्र.) - संत रविदास महाराज यांची 646 वी जयंती जीवती येथे मोठ्या उत्साहात पार पडली.सदर जयंती चे आयोजन मातंग समन्वय समिती व लहुजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले होते. जयंती कार्यक्रमानिमित्त सामाजिक चळवळीची दिशा आणि दशा यावर डॉ गोतावळे यांच्या कल्पनेतून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी चळवळीबाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच महापुरुषांचे विचाराचे अनुकरणाशिवाय सामाजिक हित शक्य नाही, असा संदेश चर्चासत्रातील मान्यवरांनी दिला.
जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गोमाजी कांबळे मुंबई तर उदघाटक म्हणून श्री पांडुरंग कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक श्री सोपानजी शिकारे, श्री लक्षमनजी आकृपे, प्रा. सुग्रीव गोतावळे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव भालेराव,प्रस्ताविक प्रा. सुग्रीव गोतावळे तर आभार प्रदर्शन श्री व्यंकटी तोगरे सर यांनी केले. श्री भानुदास जाधव यांनी तसेच इतर मान्यवरानी संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दत्ता तोगरे, श्री केशव गवाले,श्री दत्ता गायकवाड, श्री गणेश वाघमारे, श्री सूर्यकांत कोमले, श्री विजय कांबळे, श्री संतोष कांबळे,श्री दिगंबर कलवले, श्री बालाजी कंचकटले, श्री सतीश कांबळे, श्री अविनाश वाघमारे, श्री अंबादास गोतावळे, श्री चंद्रकांत रायवाड तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.