राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आरोग्य विषयक मार्गदर्शन.!

डॉ.विवेक शिंदे व डॉ.प्रिया शिंदे यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आरोग्य विषयक मार्गदर्शन.!
बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती स्थानिक निळकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात भद्रावती येथील शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथील प्रसिद्ध सर्जन डॉ विवेक शिंदे व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रिया शिंदे यांचे आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सौ अपर्णा धोटे डॉ विवेक शिंदे डॉ प्रिया शिंदे सौ संगीता खिरटकर व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
या आरोग्य विषयक शिबिरात डॉ विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तथा प्रसिद्ध सर्जन शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भद्रावती यांची उपस्थिती विद्यार्थी व नागरिकांना कॅन्सर या रोगाची कारणे व घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन करीत आजचा युवा पिढीला कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत व्यायामावर भर देण्याचा व त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते व आपल्याला कोणताही रोग होत नाही असे मार्गदर्शन केले.
तसेच याप्रसंगी भद्रावती येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ प्रिया शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भद्रावती यांनी स्त्रियांच्या आरोग्य विषयावर ब्रेस्ट कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सर यावर संपूर्ण मार्गदर्शन केले त्याचे कारणे व उपाय योजना यावर मार्गदर्शन करीत उपस्थित विद्यार्थ्यांनी व महिला यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण केले.
तसेच सौ संगीता खिरटकर सरपंच चोरा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ सौ अपर्णा धोटे यांनी स्त्रियांनी आपले आरोग्याचे काळजी कशी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन केलं.या आरोग्य विषयक शिबिराचा उपस्थित विद्यार्थिनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे संचालन आफरीन शेख व ऋत्विक सोनारखन यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता प्रा संदीप प्रधान प्रा सचिन श्रीरामे डॉ प्रा किरण जुमडे श्री प्रमोद तेलंग राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.