बल्लारपूर (का.प्र.) - आहे त्या परिस्थितीवर मात करून जीवनामध्ये यशस्वी कसे व्हायचे आणि जीवनामध्ये मेहनत आणि पुस्तक हे जरी तुम्ही जवळ केले तरी तुम्ही उच्च स्थानी जाऊ शकता जीवन जगत असताना स्वाभिमान खूप आवश्यक आहे आणि तो प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मोठ्यांचे मार्गदर्शन व मोटिवेशन महत्त्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी निळकंठराव शिंदे विज्ञान कला महाविद्यालयाचे स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दुपारच्या बौद्धिक सत्रात संबोधित केले.याप्रसंगी व्यासपीठावर श्री एम यु बरडे मुख्याध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.
तसेच मुख्याध्यापक श्री एम यु बरडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन प्रकारच्या सी ची आवश्यकता असते त्यात त्यांनी कॉन्फिडन्स कन्सिस्टन्सी अँड कंटिन्युटी हे जर तुम्ही जीवनामध्ये मिळवले तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्यासाठी नियमित सर्वात पहिले आपले ध्येय ठरवावे लागेल व त्यानंतर याला गाठण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमाचे संचालन प्रांजली बिश्वास सुचिता राऊत तर आभार प्रदर्शन समीक्षा स्वान यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करीना करता प्रज्वल पवार आकांक्षा आवारी प्रा संदीप प्रधान प्रा सचिन श्रीरामे प्रा कुलदिप भोगळे डॉ किरण जुमडे व श्री शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.