शरद युवा क्रीडा महोत्सव कब्बडी सामने संपन्न.!

श्री किल्ला हनुमान बहुद्देशीय संस्था व व्यायाम शाळा बल्लारपूर यांच्या मान्यतेने शरद युवा क्रीडा महोत्सव तर्फे जिल्हा स्तरीय कब्बडी सामने संपन्न.!
बल्लारपुर (का.प्र.) - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा क्रीडा महोत्सव-२०२३ ला जिल्हा स्तरीय ३ दिवसीय कब्बडी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील साहेब व युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब दादा शेख यांच्या आदेशानुसार या क्रीडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली, या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश भाऊ सोमानी,व्यायाम शाळा अध्यक्ष सूर्यकांतजी साळवे,यांची लाभली.

या स्पर्धेत प्रथम पुरस्कार त्यागोर क्रीडा मंडल चंद्रपूर यांनी पटकावला त्यांना पुरस्कार म्हणून ४०,००० रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली, तर द्वितीय पुरस्कार श्री. राम बालक आघाडा बल्लारपूर यांनी पटकावला त्यांना पुरस्कार म्हणून २५,०००रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली, व सर्व मंडळ चे स्वागत करण्यात आले. बल्लारपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रेक्षकांनी उत्फुर्स प्रतिसाद दिल्याने मैदानात प्रेक्षकांनी भरगच्च भरली होती त्यांचे ही आभार जिल्हा युवक अध्यक्ष इंजि. राकेश भाऊ सोमाणी यांनी मानले.या कार्यक्रमाला बळकट करण्यासाठी सुमित (गोलु) डोहणे, आरिफ सरोवर खान,अमर रहीकवार,सुरेश सातपुते, प्रकाश मुसले, जगदीश सातपुते, प्रणित सातपुते, सागर कुकडकर,श्रीनिवासन ढोडरे,शुभम जानेकर,साईनाथ सातपुते, कुणाल मोरे, निखिल सल्लम,सौरभ मंगर, विकास मंगर, अनिल कुकडकर, राहुल चनेकर, कार्तिक खेडेकर, विनोद ढोडरे, सुजित पूसम व अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.