वाघाच्या हल्यात जनावर ठार .!

वाघाच्या हल्यात जनावर ठार चालबर्डी येथील घटना.!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती तालुक्यातील घोडपेठ जवळील मौजा चालबर्डी येथील शेत सर्व्हे नंबर १७८/१ मधील जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांनपैकी दि.२४ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने एका पाळीव गायीला हमला करून ठार केले तर यावेळी एक वासरू गंभीर झाल्याची घटना घडली. यात पीडितांच्या जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर गाय ही गरोदर असल्याचे वनविभागाकडे तक्रारीत नमूद केले आहे.
शालिनी खुशाल धानोरकर असे गाय मालकाचे नाव असून , मौजा: चालबर्डी शेत शिवारातील नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्यात इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे गोठ्यात गायीला बांधून ठेवण्यात आले होते. अचानक शुक्रवारच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने गोठ्यात प्रवेश करून एका ५ वर्षीय पाळीव गाईवर हमला केला त्यात तिचा मृत्यू झाला. त्यातच एका वासरावर हमला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची तक्रार भद्रावतीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात केली असून, झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केलेल्या तक्रारीतून केली आहे. या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला असून वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.