मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनात डॉ.यशवंत घुमे सन्मानित
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत प्राध्यापक डॉ. यशवंत घुमे यांचा गोंडवाना विद्यापीठांतील वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल नुकताच गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे संपन्न झालेल्या मराठी प्राध्यापक परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनात झाडीपट्टी नाट्य कलावंत प्राचार्य सदानंद बोरकर यांच्या हस्ते
शाॅल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशनाध्यक्ष प्रा.श्रीकांत नाकाडे होते. यावेळी मंचावर पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे, प्राचार्य डॉ.सुमंत देशपांडे, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य बी.एस.खोपे, डॉ. नरेंद्र आरेकर ,मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ.गणेश मोहोड, सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे ,कार्याध्यक्ष प्राचार्य हिराजी बनपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेतून निवडून आलेल्या डॉ.अजय कुलकर्णी , डॉ.जगजीवन कोटांगले, डॉ. माधव कांडणगिरे, डॉ.प्रकाश वट्टी यांचा तथा मराठी अभ्यास मंडळावर नामित झालेले डॉ. ईश्वर सोमनाथे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे , डॉ.राजेश दिपटे, डॉ. धनराज खानोरकर , डॉ.संजय लाटेलवार , डॉ.पद्माकर वानखेडे, डॉ. रवींद्र मुरमाडे यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तद्वतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. हेमचंद दुधगवळी, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त डॉ.प्रशांत सूर्यवंशी, विदर्भ साहित्य संघाच्या चंद्रपूर जिल्हा गोंडवन शाखेच्या सचिव पदी नियुक्त झालेले डॉ.परमानंद बावनकुळे यांचाही या प्रसंगी शाॅल व पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजकुमार मुसणे, आभारप्रदर्शन डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले.