ग्राहक पंचायत चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी भद्रावतीचे प्रविण चिमुरकर यांची निवड .. संघटन मंत्री वसंत वर्हाटे, जेष्ठ मार्गदर्शक पुरूषोत्तम मत्ते तर कार्यकारिणी सदस्य म्हणून वामन नामपल्लीवार
भद्रावती (ता.प्र.) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपुरची बैठक दि.२०/०२/२०२३ ला चंद्रपुर येथे पार पडली. या बैठकीत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, प्रांत सचिव नितीन काकडे आणि जेष्ठ कार्यकर्ते पुरूषोत्तम मत्ते यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत डॉ. मेहरे, काकडे आणि मत्ते यांचेकडून अधिकृतपणे ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपुर च्या नविन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात भद्रावतीच्या चार पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपुर नविन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून सौ. नंदिनी चुनारकर, संघटन मंत्री वसंत वर्हाटे, उपाध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव प्रभातकुमार तन्नीरवार, कोषाध्यक्ष आण्याजी ढवस, महिला जिल्हा प्रमुख सौ. संगिता लोखंडे, प्रसिद्ध प्रमुख जितेंद्र चोरडीया, मार्गदर्शक म्हणून पुरूषोत्तम मत्ते आणि मधुकर भुमकर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून राम चिचपाले, वामन नामपल्लीवार, आशीष कोटकर, सदानंद आगबत्तनवार, भाग्यश्री भुमकर, सुनिल वनकर यांची निवड करण्यात आली.
चंद्रपुर येथे झालेल्या बैठकीत डॉ.मेहरे यांनी सर्व नविन कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते तसेच उपस्थिती नागरिकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची देण आहे आणि ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती कशी झाली, ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मिती मागे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे काय स्थान आहे यावर विशेष माहीती दिली. त्यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याबद्दल, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ विषयी विस्तृत माहिती दिली. प्रांत सचिव काकडे यांनी ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायतीचे कार्य गावागावात कसे पोहचेल यावर विशेष भर दिला आणि चंद्रपुर जिल्हा ग्राहक पंचायत ग्राहकांसाठी, शोसनमुक्त समाजासाठी महत्वाची भुमिका पार पाडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.