शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात पार पडला..!

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा संस्कृती व परंपरा जपून अगदी शिष्टबद्द व उत्कृष्टपणे जल्लोषात पार पडला..!
बल्लारपूर (का.प्र.) - श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे चार दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघटनेच्या प्रमुख मार्गदर्शक अभि उमरे, स्वप्नील मोहितकर, युगल ठेंगे व निखिल बावणे यांच्या नेतृत्वात  साजरा करण्यात आला. 
यावेळी पहिल्या दिवशी दि.१७/२/२३ रोजी शिवचरित्र एक संस्काराचा धडा, शिवशाही ते लोकशाही,शिवकालीन स्वराज्य आणि आधुनिक महाराष्ट्र या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेला जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणा वरून एकूण 45 स्पर्धक हजर होते व प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून मा.विशालजी शिंदे ,नगर सेवक नांदुभाऊ पढाल, प्रा.हटवार सर, प्रा. ठाकरे सर, मा. शहारे सर , मा.सातपुते सर व लेडागे मॅडम मंचावर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी दि.१८/२/२३ रोजी भव्य  रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. कुंभारेजी, नागरी आरोग्य केंद्र व सर्व कर्मचारी वर्ग,भद्रावती, डॉ. चांदेकर साहेब व कर्मचारी वर्ग चंद्रपूर सरकारी रक्तपेढि व सेवा फौंडेशन चे मुख्यता योगदान लाभले.
तिसऱ्या दिवशी दि. १९/२/२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य मानवंदना व विशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण स्वागत बँड पथक, दुर्गा वाहिनी महिला मंडळ, ध्वज पथक, पालखी, महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा, नया व्याम शाळा आखाडा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, विविध शिवकालीन देखावे झाख्या, महापुरुषाची वेशभूषा व महाराजांच्या गाण्याचा ताल डिजे व दुमदुमत होता. यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविभाऊ शिंदे, पोलिस स्टे.चे कर्मचारी बांधव , नगर परिषद भद्रावती चे सव कर्मचारी व नगर सेवक सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक शाळा, कॉलेज, ट्युशन चे शिक्षक व विद्यार्थी, जेष्ठ वरिष्ठ तसेच भद्रावती नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. 
चौथ्या दिवशी दि.२०/२/२३ रोजी मा. व्याख्याते ह.भ.प. श्री सोपान कनेरकर यांचे व्याख्यान घेण्यात आले तसेच बक्षीस वितरण व सत्कार सोहळा पार पडला. यावेळी संचालन प्रा. अमोल वा. ठाकरे ,प्रास्ताविक निखिल बावणे तर आभार स्वप्निल मोहितकर यांनी मानले. अध्यक्ष मा रमेश राजुरकर ,यांच्यासह चंदूभाऊ खारकर, किशोरजी टोंगे, तसेच इतर शाळेतील शिक्षक गण व नागरिकांनी सदर व्याख्यानाचा लाभ घेतला.स्पर्धेत प्रथम ,द्वितीय ,तृतीय येणाऱ्या स्पर्धाकांना अनुक्रमे 5000,3000 व 2000 रु.रोख स्वरूपात व तीन प्रोत्साहन बक्षीस ,सिल्ड, प्रमाणपत्र देण्यात आले तसेच रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व इतरांना प्रशस्ती पत्र सुद्धा देण्यात आले.  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.सर्वांचे मनःपूर्वक जाहीर आभार व धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.