बल्लारपुर (का.प्र.) - राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती व अनोखा गृहप्रवेश,मौलाना आझाद वार्ड,बल्लारपुर येथील वयोवृद्ध श्री मारोती परचाके यांना कोणाचाही सहारा नसून पत्नी आधीच मरण पावली. पडक्या झोपडीत कसे बसे दिवस काढत होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरून ते रोडवर राहत होते. वनविभागाच्या जागा असल्यामुळे सरकारी घरकूल योजना मिळत नाही. बंडू भाऊ लोनगाडगे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी लोकवर्गणीतून 2 रूम चे बांधकाम सुरू करण्याचे ठरविले. व 1 लाख रुपये गोळा करून बांधकाम पूर्ण केले. सकाळी 6 वा.सामुहिक ध्यान 7 वा .ग्रामगीता वाचण्यात आले. 8 वा.सुधाकर डंभारे यांचा भजनाचा कार्यक्रम व 10 वा.पासुन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांचे गाडगेबाबा यांच्या जयंती वर कीर्तन झाले. दि.23/2/23 रोज गुरुवार ला गाडगेबाबा यांच्या जयंती च्या दिवशी कोणतीही पूजापाठ न करता गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्री बाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गृहप्रवेश केला. गुरूदेव सेवा मंडळ, वे.को.लि.बल्लारपुर 3 & 4 pits व अन्य लोकवर्गणीतून 1 लाख रुपये गोळा करून बांधकाम करण्यात आले. सुरुवातीला सकाळी 6 वा. सामूहिक ध्यान 7 वा.ग्रामगीता वाचण्यात आले. 8 वा.सुधाकर डंभारे यांचा संच यांचे भजन कार्यक्रम व सकाळी 10 वा.पासून ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन झाले. गृहप्रवेश उदघाटन चे अध्यक्ष श्री पांडुरंग जरीले, उदघाटक श्री कडेल साहेब, प्रमुख पाहुणे अशोक पटेल साहेब, दुबे साहेब, विनायक साळवे सर, माजी नगरसेविका जयश्री मोहुरले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री राजदादा धूमनर, होते. प्रास्ताविक बंडू लोनगाडगे समाज सेवक, संचालन व आभार सतिश ढोके, यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रवक्ते राज दादा घुमनर, पटेल साहेब, कडेल साहेब, विनायक साळवे सर, पांडुरंग जरीले यांचे भाषण झाले. यशस्वी ते साठी बंडू भाऊ लोनगाडगे, पांडुरंग जरीले, सतीश ढोके, दिनेश परचाके, गणपत राखुंडे, पंडित देवुळकर, तुळशीराम उईके, राऊत, बद्दलवार, सोयाम,ठाकरे गुरूजी, भय्याजी त्र्यंबक, पाल बाबू यांचे अथक परिश्रम केले.