बल्लारपूर (का.प्र.) - मा.जिल्हाधिकारी, चंद्रपुर आम्ही राणी लक्ष्मी वार्ड, किला वार्ड, गांधी वार्ड आणि या परिसरातील वस्ती विभागाचे आजू बाजू भागातील ५० वर्षा पासून राहणारे लोक आहोत. या परिसरातील श्री टोकिज जवळ उज्जवला बार, आर. के. बार व सागर बीयर शोपी आहे. तसेच १०० मीटर च्या आत तहसील कोर्ट, देव स्थान, जनता विद्यालय सिटी ब्रांच, जव्हेरी गर्ल्स शाळा आहे. या रस्त्यावर शाळेची मुले व मुली येणे जाने करतात.
माधुरी रेड्डी यांचा घरी लहान मुला व मुली ची शिकवणी वर्ग (Tuition Classes) आहेत. त्यांच्या बाजूला सागर बीयर शोपी आहे. त्याच्या सुधा त्यांना जास्त त्रास आहे आणि तो एकच मुख्य रस्ता आहे वस्ती जाण्या – येण्यासाठी शैक्षणीक संस्था जव्हेरी कन्या विद्यालय बल्लारपूर, जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लारपूर, तसेच दिवानी व फौजदारी न्यायालय, स्त्रिया व पुरुष लहान मुला व मुली ना त्रास होत आहेत.
या सदर ठिकानी देशी दारूचे दुकान दिल्यास येथील शाळकरी मुला व मुलींना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. दारू व्यवसायामुळे लोक दारू पियुन येथे अनुचित प्रकार घडू शकते त्या मुळे सदर परिसरात कोणतेही देशी दारूचे किंवा कोणत्याही मद्य व्यवसाया करिता परवाना देण्यात येऊ नये.
जर येते देसी दारूची दुकान दिल्यास कायदा व सुव्यस्त (Law and Order) भंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. आताच दोन बार व एक बीयर शोपी आहे. झगडे होत असतात त्याच पण आम्हाला जास्त त्रास होत आहे. जेणे करून आम्हच्या निवेदनावर पाहणी लवकरात लवकर करण्यात यावी.
हे निवेदन सबंधित सर्व विभागाला तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही महिलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिला आहे.याबाबत योग्य निर्णय न झाल्यास महिला या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.