"ड्रीम पॉइंट आर्टिस्ट असोसिएशन,बल्लारपुर" कार्यालयाशी संपर्क साधावा..!
बल्लारपूर (का.प्र.) - शासन निर्णय क्र. वृक्रमा २०१२/प्र.क्र.११७/सांका ४. दिनांक ७ फेब्रुवारी २०१४, परिशिष्ट-१, वृद्ध साहित्यीक व कलाकार यांना (मानधन) योजना "पेंशन" पात्रतेचे निकष अटी व शर्ती -
🔴 "रहिवाशी प्रमाणपत्र" :- अर्जदार किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. (डोमेसियल सर्टिफिकेट - अधिवास प्रमाणपत्र)
🟠 "वय" :- स्त्री/पुरूष-वृद्ध साहित्यीक व कलाकार यांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
🟡 "अपंगत्व व रोगाबाबत" :- जे साहित्यीक व कलावंत अर्धांगवायु, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग इत्यादि रोगांनी आजारी असतील व ज्यांना ४० टक्के शारीरिक व्यंग असेल किंवा अपघाताने ४० टक्के अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करू शकत नसतील असे साहित्यीक व कलावंत वयाची अट शिथील करण्यात येईल.
🟢 "उत्पन्न" :- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. ४८०००/- पेक्षा जास्त नसावे.
🔵 "पात्रतेची अर्हता" :- साहित्य क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे. तसेच कला आणि वाड:मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्त्वपुर्ण कामगीरी केली असेल असे वृद्ध साहित्यीक - कलावंत थोडक्यात ज्यांनी साहित्य किंवा कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे असे मान्यवर.
🟣 "कार्याचे पुरावे" :- साहित्यिक - कलावंत असल्याबाबत तसेच या क्षेत्रात १५ ते २० वर्षे इतका प्रदिर्घ काळ कार्य केल्याबाबतचे परिशिष्ट - १ मधील क्रमांक १७ मधील (अ ते इ) -
अ) प्रकाशित साहित्य / लेखनाची कात्रणे / कलावंतांच्या कार्यक्रमांची छायाचित्रे / वृत्तपत्रिय बातम्या / जाहिराती / आकाशवाणी अथवा दुरदर्शनवरील कार्यक्रमाचे पुरावे /
निमंत्रण पत्रिका / प्राप्त प्रशस्ती पत्रकांची माहिती ज्यात अर्जदाराचा उल्लेख आहे अशा शासकीय अभिलेखाची साक्षांकित प्रत.
ब) केंद्र शासनाचा / राज्य शासनाचा / सांस्कृतिक
मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र.
क) केंद्र / राज्य शासनाच्या साहित्य अकादमी / संगीत नाटक अकादमी / राज्य शासनाचे साहित्य व सांस्कृतिक विषयक पुरस्कार / पश्चिम क्षेत्र किंवा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र / सांस्कृतिक कार्य संचालनालय / आकाशवाणी / दुरदर्शन / साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे.
ड) जिल्हाधिकार्यांनी निश्चित केलेल्या वाड्मय विषयक अथवा कला विषय नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र जोडावे.
इ) नामांकित संस्था / व्यक्तीचे शिफारस पत्र.
या पुराव्यांपैकी किमान दोन पुरावे सादर करावेत.
⚫ "हयातीचा दाखला" :- प्रत्येक आर्थिक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापुर्वी संबंधीत मान्यवर हयात असल्याबाबतचा दाखला त्यांच्याकडून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.
🟤 "इतर शाकीय योजनांचा लाभ" :-. शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमीत मासिक आर्थिक लाभ घेणारी व्यक्ती या मानधन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
🟥 अर्ज (फॉर्म) 'ड्रीम पॉईंट आर्टिस्ट असोसिएशन, बल्लारपूर ह्यांच्याकडे "मुफ्त" (निःशुल्क) pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहे. उपर्युक्त सर्व नियम व अटी पूर्ण असलेलेच कलावंतांनीच (कार्यालय दूरध्वनी क्रमांक 9405383622 ह्या व्हॉट्सॲप आणि कॉलिंग) नंबरवर संपर्क करून (pdf फॉरमॅट) फॉर्म स्विकारू शकतात.
अशी विनंती "ड्रीम पॉइंट आर्टिस्ट असोसिएशन,बल्लारपुर" चे मा.प्रकाश महाकाले (संस्थाध्यक्ष), मा.पांडुरंग जरिले (संस्था उपाध्यक्ष), श्री गणेश मुरलीधर रहिकवार (संस्थापक सचिव), मा.हरिभाऊ डोरलिकर (संस्था सह सचिव), सौ.सुनंदा खंडाळकर (संस्था कोषाध्यक्षा), श्री रवि मानेकर (संस्था संचालक), श्री गणेश अंड्रस्कर (संस्था संचालक) ह्यांनी केली आहे.
सध्या फक्त चंद्रपूर जिल्ह्यातीलच सर्व सन्माननीय कलावंतांनीच संपर्क साधावा.