सोपान कनेरकरांचे व्याख्यान .!
भद्रावती (ता.प्र.) - श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावतीच्या वतीने चार दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा प्रमुख मार्गदर्शक स्वप्निल मोहितकर, युगल ठेंगे ,निखिल बावणे, अभी उमरे,आदी तरुणांच्या नेतृत्वात जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी पहिल्या दिवशी शिवचरित्र एक संस्काराचा धडा, शिवशाही ते लोकशाही, शिवकालीन स्वराज्य आणि आधुनिक महाराष्ट्र या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत एकूण 45 स्पर्धकांनी भाग घेतला . यात परीक्षक डॉ. ज्ञानेश हटवार , डॉ. शहारे सर यांनी काम पाहीले. दुसऱ्या दिवशी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना व भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, पो. स्टे.चे कर्मचारी , सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी वृंद तसेच भद्रावती नगरीतील तरुण, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
चौथ्या दिवशी यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात शिवचरित्रावर व्याख्यान घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरित्रावर महाराष्ट्रात व्याख्यान देणारे तरुण व्याख्याते, कीर्तनकार सोपान कनेरकर यांचे व्याख्यान घेण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर हे होते. तर नगरसेवक चंद्रकांत खारकर, किशोर टोंगे, अनिल पिट्टलवार प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या स्पर्धाकांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रुपये ५०००, ३००० व २००० रोख स्वरूपात, सिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल बावणे, संचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभार प्रदर्शन स्वप्निल मोहितकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहिल बोनागिरी, निखिल उगे, साहिल तांगडपल्ली, मंथन राजूरकर , सोनू कुचेकर ,मनोज पेटकर, ऋषी वरखडे, साहिल आस्कर, अमित उगे, चेतन मांढरे, शिवा पांढरे, प्रवीण गिरोले, सौरभ घागी, श्रीपाद भाकरे,अनमोल मोरे, आदींनी अथक परिश्रम घेतले. व्याख्यानाला भद्रावती शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.