चंद्रपुरात योग व आसनांची स्पर्धा संपन्न .!

यंग चांदा ब्रिगेड व महिला पतंजली समितीच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात योग व आसनांची स्पर्धा संपन्न .!
चंद्रपुर (वि.प्र.) - चंद्रपूर येथील माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत दि.२२फेब्रुवारला चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेड व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर मनपाच्या गांधी चौकातील भव्य प्रांगणात प्रथमच योग व कठीण आसनांची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यासह अमरावती, नागपूर येथील 70 /75 मुली मुले स्पर्धकांचा सहभाग होता. ही स्पर्धा चार गटात विभागल्या गेली होती. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले अतिशय उत्साही वातावरणात ही स्पर्धा यशस्विरित्या पार पडली. स्पर्धेकरिता पंच म्हणून प्रा. तानाजी बायस्कर व त्यांच्या टीमने आपली भूमिका पार पाडली. तसेच महिला पतंजलीच्या राज्य कार्यकारणी सदस्या सौ.स्मिताताई रेभणकर जिल्हा प्रभारी नसरीन शेख, जिल्हा महामंत्री सौ.अपर्णाताई चिडे, ज्योतीताई मसराम, तालुका प्रभारी प्रतिभा रोकडे, यंग चांदा ब्रिगेड च्या वंदनाताई हातगावकर, शुभांगी डोंगरवार, वंदना भूषणवार,अंजुषा दलाल ,कल्पना कोयलवार,आशा दुधपचारे, मनीषा गौरकर, नीता धामणगे,कामिनी वैरागडे, सविता मसराम,अंजली साटोणे,लता खंगार ,वैशाली बांगडे,विमल काटकर, शारदा डाखोरे, वैशाली रामेडवार,वैशाली साटोने,पुजा गिरीपुंजे, योग समिती चे वरिष्ठ मार्गदर्शक राजकुमार पाठक,अलोक साधनकर, मोहनराव मसराम आदींचे सहकार्य लाभले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.