तंटामुक्ती समितीच्या बैठकीतच राजकुमार सुरनार यांच्यावर प्राणघातक हल्ला .!

जिवती तालुक्यातील वणी मधे घडला हा दुर्दैवी प्रकार, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष व गावांतील प्रतिष्ठित व्यक्ती बनले मौनिबाबा .!
जिवती  (वि. प्र.) - जिवती तालुक्यात वणी या गावांतील बालाजी सुरनार यांनी आपल्या मोठ्या सख्ख्या भावाच्या पत्नीला पळवून नेल्याने गावांत सगळीकडे संताप व्यक्त होतं असतानाच दुसरीकडे बालाजी सुरनार यांच्या पत्नीने आपल्या भासरा असलेल्या राजकुमार सुरनार यांच्या जमिनीचा हिस्सा पाहीजे म्हणून तंटामुक्ती समितीची बैठक बोलावून त्या बैठकीत राजकुमार सुरनार याला आपल्या वडील,आई, भाऊ व इतर नातेवाईक यांच्या मदतीने भर बैठकीत हल्ला करून बेदम मारहाण केली दरम्यान त्याचा भाऊ संतोष आडवा आला असता त्याला पण बेदम मारहाण केल्याने वणी या गावांत तंटामुक्ती समिती म्हणजे तंटा निर्माण करणारी समिती आहे का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकुमार सुरनार याला पाच एकर शेतजमीन असून ती शेतजमीन त्यांनी कष्टाने व मेहनत करून मिळवली असून त्यात त्यांनी दोन भावांचा व त्यांच्या लग्न कार्याचा खर्च उचलला व आजही त्यांनी आपल्या अपंग बहीण यांचा सांभाळ करून लहान भावांच्या मुलांचा खर्च उचलत आहे, दरम्यान त्याचा लहान भाऊ बालाजी उत्तम सुरनार यांनी माधवा भाऊ संतोष उत्तम सुरनार यांची पत्नी रेणुका संतोष सुरनार हिला पळवून नेले त्यामुळे त्यांच्या लहान भाऊ बालाजी उत्तम सुरनार यांची पत्नी जयश्री बालाजी सुरनार हिने तो दोष राजकुमार यांना देऊन त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीत वाटा मिळावा म्हणून तंटामुक्ती अध्यक्षा कडे तक्रार देऊन दिनांक 19/2/2023 ला सकाळी 10 वाजता बैठक बोलावली.
त्या बैठकीत तंटामुक्ती अध्यक्ष जालीम कोडापे, उपाध्यक्ष आनंद पवार. गावांतील प्रतिष्ठित नागरिक बळीराम विठ्ठल देवकते दत्ता हरिभाऊ राठोड हे प्रामुख्याने हजर असताना राजकुमार यांना विचारणा करण्यात आले की तुम्ही तुम्हच्या शेतजमिनीतून हिस्सा हा जयश्री बालाजी सुरनार हिला द्या त्यावर त्यांनी म्हटले की माझ्याकडे जी पाच एकर शेतजमिन आहे ती माझ्या वडिलांनी घेतली नसून मी माझ्या मेहनतिने घेतलेली आहे व त्यामुळे मी ती देऊ शकत नाही. हे ऐकताच उत्तम दादाराव कुंडगीर सुनीता उत्तम कुंडगीर, जयश्री बालाजी सूरनार, दादाराव उत्तम कुंडगीर. 
सर्व रहाणार वणी, गोविंदा परकड रा चिखली यांनी त्यांचेवर सामूहिकपणे हल्ला करून तंटामुक्ती समिती च्या बैठकीत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या अचानक झालेल्या हल्लामुळे त्याचा मधवा लहान भाऊ संतोष मधात आला असता त्याला सुद्धा बेदम मारहाण केली. त्यामुळे राजकुमार यांनी जिवती पोलीस स्टेशन मधे तक्रार देऊन पाचही लोकांवर गुन्हे दाखल करून मला न्याय द्यावा अशी मागणी केली मात्र आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून राजकुमार सुरनार याला पोलिसांनी घरी पाठवले.
राजकुमार सुरनार व त्यांच्या परिवारावर कधीही हल्ला होऊ शकतो या भीतीने त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली असून दोषी विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे व याच्या प्रती विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर व राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे पाठवल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.