परीक्षा देत असतांना खूप वेळा पेपरपेढवर महापूरूषाचे फोटो असतात.!

येवदा (वि. प्र.) - दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु होत आहे त्या पूर्वी सांगावेसे वाटते की परीक्षा देत असतांना खूप वेळा पेपरपेढवर महापूरूषाचे फोटो असतात.
पेपरपेढवर महामानवाचे फोटो आहेत ही विदयार्थ्यांना साठी प्रेरणादाही गोष्ट आहे, मानतो पण तितकेच वाईट देखील आहे.
कारण पेपर देत असतांना महापू षाच्या फोटोवर फोटोवर पेपर ठेवून पेपर लिहिणे हे कुठवर योग्य आहे. ही संतांची भूमी आहे.
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पेपरपेढवर दिसून येतात . त्यांच्या फोटोवर पेपर ठेवून लिहिणे म्हणजे त्यांचा खूप मोठा आपण अपमान करत आहो.याचा आपण कुठंतरी विचार केला पाहिजे , पेपरपेढ निर्मितीवर आपण आढा घातला पाहिजे . महापुरुषा च्या फोटो ऐवजी कार्टून, निसर्गरम्य, पक्षी , नदी, असे अनेक चित्र छापावे . ज्या पेपरपेढची छपाई झाली ज्यावर महापुरुष असतील अश्या पेपरपेढला परीक्षा केंद्रावर जमा करावे. अशी चुक पुन्हा होणार नाही याची काळजी घेवू.
असे मत कला फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत दामले समाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी सर प्रवीण  घनबहादूर, विशाल दामले, ऋषिकेश पडांगे, मंगला ढोके, रीना दामले, यांनी विद्यार्थ्याना उजवलं भविष्याच्या शुभेच्छा देऊन आपले मत वेक्त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.