मुख्य संपादक प्रबोधनी न्युज आणि इंडिया24लाईव्ह तथा विदर्भ सरचिटणीस प्रहार कामगार संघटना मा. प्रशांत ताराचंद रामटेके यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती .!
बल्लारपुर (का.प्र.) - मुख्य संपादक मा. प्रशांत ताराचंद रामटेके हे सदैव संघटनेच्या माध्यमातून तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसाठी सतत न्याय द्यायचे काम करत असतात गोरगरीब जनतेला काय मदत करत असतात याच कामाची पावती म्हणून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची प्रगती पाहता.
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात ही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना मोठ्या झपाट्याने वाढत आहे. तरुण, तरुणी, मोठ्या संख्येने संघटनेत सामील होत आहेत. अन्याय अत्याचार, बेरोजगारी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा अजेंडाड तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संघटना घेऊन निघाली आहे. संविधान, आरक्षण, लोकशाही वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे. पुन्हा तथागत ग्रुपचा झंझावात उभा राहत आहे संघटनेत रोज शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. संस्थापक अध्यक्ष मा.संदिप गवई व तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.पै.अनिकेत पवार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.पै.अविनाश कांबळे यांच्या लढाऊ वृत्तीला प्रेरित होऊन मोठं पाठबळ मिळत आहे. संघटनेत आलेल्या सर्वांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्रातील जिल्हा- तालुके, शहर, ग्रामशाखा महिला आघाडी कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते स्वागत करत असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाचा त्यांच्यावर वर्षांव होत आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले की तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना समिती पदाधिकारी व महिला आघाडी कार्यकर्ते यांच्या विश्वासाला तडा न जाता मी असेच इमानदारीने काम करत राहील असे प्रशांत ताराचंद यांनी सांगितले व त्यांनी सर्व अधिकारी यांचे आभार मानले.अशा करतो कि आपल्यावर दिलेल्या जिम्मेदारीला आपण न्याय द्याल.
शुभेच्छुक - तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना समस्त पदाधिकारी व महिला आघाडी कार्यकर्ते.