पुर्व महाराष्ट्र व जिल्हा महिला पतंजली योग समितीतर्फे चंद्रपूरात जागतिक महिला दिन अपुर्व उत्साहात साजरा .!
बल्लारपुर (वि.प्र.) - स्थानिक राजीव गांधी सभागृहात दि.२६ मार्च ला पुर्व महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्हा महिला पतंजली योग समिती तर्फे पूर्व महाराष्ट्राच्या राज्य प्रभारी आदरणीय सौ.शोभा भागिया यांचे अध्यक्षतेखाली व पुर्व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.स्मिता रेभनकर यांचे मार्गदर्शनात तसेंच चंद्रपूर जिल्हा प्रभारी नसरीन शेख यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अनुषंगाने प्रारंभी जनजागृती करण्यासाठी योग नारा देत महिला भगिनीनींची बाईक रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाला प्रामुख्याने सौ.शोभाताई भागिया, एस. पी. राधिका फडके ,सह आयुक्त महानगरपालिका विद्या पाटिल, बल्लारपुर तहसीलदार स्नेहल रहाटे मॅडम, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, स्वाती महेशकर फॉरेस्ट डिपार्टमेंट RFO, शिल्पा गिरडकर ऍडवोकेट,आ.भावना विपीनजी पालिवाल ,वनिता गर्गेलवार मेडिकल ऑफिसर ,शाहीन शेख सोशल वर्कर, छबुताई वैरागडे माजी झोन सभापती , आदी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तथा पाहुण्यांचा स्वागत सोहळा आटोपुन याठिकाणी लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्टॉल चे उदघाटन करण्यात आले.
तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महिला दिनाच्या निमित्ताने निवड केलेल्या सत्कार मूर्ती रेल्वे स्टेशन कुली मंगला मडावी व साफसफाई कामगार अल्का शास्त्रकार यांना मोमेंटो देवुन स्वागतपर सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा रोकडे व रेणुका साटोणे यांनी पार पाडले. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फूड स्टॉल, गुढीपाडवा गुढी सजावट,आई आणि मुल यांचा फॅशन शो ,सासु-सुनबाई यांचा रॅम्प वॉक, सोलो डान्स, ग्रुप डान्स विविध प्रकारचे गेम शो घेऊन महिला जागतिक दिन कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक महिला पतंजली योगा समिती चंद्रपूर,जिल्हा प्रभारी नसरीन शेख,जिल्हा महामंत्री अपर्णा चिडे, वरिष्ठ सल्लागार ज्योती मसराम,वंदना भूषणवार,वंदना संतोषवार,आशा दूधपचारे,स्मिता श्रीगडीवार,लता चाफले,अंजुषा दलाल,कल्पना कोयलवार, मनिषा गौरकर, तालुका प्रभारी प्रतिभा रोकडे ,नीता धामणगे,छाया मायकल वार माधुरी बोडेकर,कामिनी वैरागडे, चितवन चव्हाण,अंजली साटोणे,नास्ता व अल्पोपहार करून कार्यक्रम समपन्न झाला .