भोई गौरवने केला गुपचूप व भेळ विकणाऱ्या अर्चना शिवरकरचा सत्कार .!

नागपुर (प्रा.राहुल जी.गौर) - सौ.अर्चना कमलेश शिवरकर आपली भोई भगिनी हीचा आज जागतिक महिला दिनी सक्करधरा चौक नागपूर येथे तिच्या व्यवसायाच्या ठीकणी "भोई गौरव मासिकाच्या" वतीने सत्कार करण्यात आला.
भोई गौरवचे मुख्य संपादक श्री.चंद्रकांत लोणारे यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन तिचा सत्कार केला.या प्रसंगी भोई गौरवचे सहसंपादक प्रा. राहूल गौर, सह- संपादिका सौ चीत्रा मेश्रे,सभासद श्री.अशोक दुधपचारे,सौ. कल्पना चाचेरकार, सौ. मनीषा मोहजे, सौ. वर्षा नरेंद्र बावणे, सौ.छाया पोईनकार, सौ. सुशीला लोणारे,सौ.वैशाली दुधपचारे,छाया मोहनकर इत्यादी उपस्थित होते.
स्व.विठ्ठलरावजी न्हाने सोमवारी कॉर्टर नागपूर यांची अर्चना ही कन्या आहे. सक्करधारा पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एच. डी. एफ. सी. बँके समोर गुपचूप व भेळ विक्रीचा ठेला लावून ती यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. याच चौकात त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठलरावजी न्हाने चाळीस वर्षापासून तिच्या वडिलांचा ठेला होता. शिवराज लीथो प्रेस नागपूर येथे नोकरी करून सायंकाळी गुपचूप व भेळ विकत होते. त्यानंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलाने चालविला परंतु पाच वर्षांपूर्वी त्याचेही निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी अर्चना वर आली. अर्चना कमलेश शिवरकर हिने मोठ्या हिमतीने या व्यवसायात पाऊल टाकले.
नागपुरातील सक्करदरा चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात तिने हा वडिलोपार्जित व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळला. रोज सायंकाळी साडेपाच ते दहा या वेळेत ती हा व्यवसाय करते. या व्यवसायातला कुठलाही अनुभव नसताना तिने आता मात्र या व्यवसायात चांगली पकड घेतली आहे. स्वाद चांगला असल्यामुळे तिच्या ठेल्यावर सतत गर्दी असते. 
माहेर व सासर या दोन्ही कुटुंबाची जबाबदारी तिने यशस्वीपणे सांभाळली आहे. स्त्री आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाही याचे हे ज्वलंत उदाहरण आम्ही पाहिलं व अनुभवलं तिची प्रत्यक्ष भेट घेतली असता तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या हिमतीला आमचा सलाम.

1 Comments

Previous Post Next Post
clipboard. ".