डॉ.रमणिक एस. लेनगुरे यांचा राहुल उमाळे मेमोरिअल कॉन्हेन्ट एंड स्कूल, डायमंड नगर नागपूर च्या वतीने सत्कार.!
नागपुर (वि.प्र.) - डॉ.रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर, प्रसिद्ध विचारवंत, समाजसेवक, संशोधक, करिअर व स्पर्धा परीक्षा कौन्सलर, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रेकार्ड होल्डर कवी, वाचन चळवळीचे पुरस्कर्ते, प्रेरणादायी मार्गदर्शक, हेल्थ कोच व विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत.
सामाजीक बांधिकली जपत अविरतपणे मानवतेचे कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा म्हणून राहुल उमाळे मेमोरिअल कॉन्हेन्ट अॅण्ड स्कूल च्या वतीन,े डॉन्स स्पर्धा आणि गदरींग कार्यक्रमा निमित्य त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती विमल उमाळे (अध्यक्ष,जनसेवा बहुउद््देशीय संस्था,नागपूर), श्री कपील उमाळे (सचिव,जनसेवा बहुउद््देशीय संस्था,नागपूर), श्री विजयजी झलके, (माजी नगरसेवक)श्री राजुभाऊ साकोरे, श्रीमती नंदाताई भोयर, श्रीमती चरडे मॅडम उपस्थित होते.
