चिरादेवी येथे संजीवनी महिला ग्राम संघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा !

भद्रावती (ता.प्र.) - तालुक्यातील चिरादेवी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. निरूपलाताई मेश्राम, उद्घाटक सौ. नीता नितनवरे मॅडम (ग्रामसेविका ग्रा. प. चिरादेवी), प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कक्ष भद्रावती चे IBCB विवेक हरणे, हर्षा, सीमा कुटेमाटे, ग्राम संघ अध्यक्ष रंजना मडावी, सचिव पपीता आत्राम, कोषाध्यक्ष अनिता ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत गीताने करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते स्वराज्य संस्थांपक राजमाता जिजाऊ, स्री शिक्षणक्षेत्रात क्रांती करणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटक नितनवरे यांनी स्रियांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आजची स्री फक्त "चुल आणि मूल" यावरच आधारित नसुन पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. प्रत्येक क्षेत्रात स्री सर्वोत्तम कामगिरी बजावत आहे. अडीअडचणींना सामोरे जाऊन स्रियांनी समोर आले पाहिजे. तरचं जागतिक महिला दिनाला महत्त्व आहे. असे वक्तव्य सौ. नितनवरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरणे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कशाप्रकारे उपक्रम राबविले जातात. याची माहिती या कार्यक्रम प्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा निरूपलता मेश्राम यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्रियांनी एकत्र येऊन लघुउद्योग सुरू करून चांगला नफा मिळवून स्रियांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. यावेळी मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले.
स्रियांनी भाषणे व गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून जागतिक महिला दिनावर सौ. सपना शेडमाके यांनी भर देऊन महिलांचे अधिकार, महिलांच्या समस्या व जागतिक महिला दिन केव्हा सुरू झाले यावर मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गिताताई उपरे, आभार प्रदर्शन सविता कांबळे यांनी केले. गावातील सर्व महीला व शाळेच्या शिक्षक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले व कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".